International Yoga Day sakal
आरोग्य

International Yoga Day 2024 : उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही दोन योगासनं, जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

सकाळ डिजिटल टीम

लठ्ठपणा दूर करून शरीराला एक परिपूर्ण आकार देणे असो किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवणे, योगासन हे प्रत्येक समस्येवर उपाय आहे.

फक्त शारीरिक, मानसिक स्वास्थ्यच नाही तर योग करून तुम्ही उन्हाळ्यातही स्वतःला थंड ठेवू शकता. शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी, सनस्ट्रोक टाळण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही या 2 योगासनांचीही मदत घेऊ शकता.

तितली आसन

  • हे आसन करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर चटई टाकून बसावे लागेल.

  • आता तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवावे लागतील.

  • आता दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा.

  • शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा.

  • तुम्हाला असे 10-15 वेळा करावे लागेल.

  • हे आसन पचनक्रियाही सुधारते.

  • हे आसन मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

  • असे केल्याने तणाव दूर होतो.

मत्स्यासन

  •  हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पद्मासनात बसून दीर्घ श्वास घ्या आणि शरीराला आराम द्या.

  • आता हळूहळू शरीराला मागे वाकवा. प्रथम उजवी कोपर जमिनीवर ठेवा.

  • शरीराला शक्य तितके वाकवून एक कमान बनवा. जास्त ताणू देऊ नका. आता उजव्या हाताने पायाचे बोट धरा. डोकं जमिनीवर ठेवा.

  • डोळे बंद करून आराम करा आणि हळूहळू श्वास घ्या आणि श्वास सोडा.

  • काही काळ पद्मासनात विश्रांती घ्या.

MCAने २७ वर्षांनंतर Irani cup जिंकलेल्या मुंबई संघाला जाहीर केले १ कोटी रुपयांचे बक्षीस

Akola Incident: अकोल्यात दगडफेक अन् जाळपोळ, नंतर लाठीचार्ज, घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, थेट सरकारवर टीकास्त्र डागलं

Latest Maharashtra Live News Updates : हर्षवर्धन पाटील यांनी NCP (SP) मध्ये प्रवेश केला

Kalva Crime : खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप!

Vidhansabha Code of Conduct : विधानसभा आचारसंहितेचे बचत गटाच्या लाडक्या बहिणींवर घोंघावतय आर्थिक संकट

SCROLL FOR NEXT