Kumar Vishwas Swashyam 2022 Sakal Digital
आरोग्य

Swasthyam 2022: ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त? सांगतायंत कुमार विश्वास

विख्यात कवी व वक्ते कुमार विश्‍वास ‘सकाळ’च्या ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाचे शुक्रवारी (ता. ९) उद्‍घाटन करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

विख्यात कवी व वक्ते कुमार विश्‍वास ‘सकाळ’च्या ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाचे शुक्रवारी (ता. ९) उद्‍घाटन करणार आहेत.

Swasthyam 2022

विख्यात कवी व वक्ते कुमार विश्‍वास ‘सकाळ’च्या ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाचे शुक्रवारी (9 डिसेंबर) उद्‍घाटन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांना आवाहन करताना त्यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासंदर्भातील त्यांचे विचार वाचकांसमोर मांडले आहेत.

धकाधकीच्या जीवनात आपण अनेक आव्हानांना सामोरे जात आहोत. त्यात काही बाह्य आव्हाने आहेत तर, काही शरीरांतर्गत. त्यातही मानसिक आणि शारीरिक, असे प्रकार करता येतात. शारीरिक व्याधींवर औषधांद्वारे उपचार होऊ शकतात. त्या व्याधी काही काळासाठी बऱ्याही होतात. परंतु, मानसिक व्याधींचे काय? त्या दूर करण्यासाठीचे उपाय आपल्याच हातात आहेत.

कोणत्याही आजाराचा संबंध मनाशी आहे, शरीराशी नव्हे. मन शांत असणे आवश्यक आहे. मानसिक शांतता मिळाल्यास मनुष्य सुखी होतो, असे हजारो वर्षांपासून आपले ऋषीमुनीही सांगत आले आहेत. वेदांपासून पुराणांतही तसे म्हटले आहे. मन-शांती मिळविण्यासाठीचे अनेक मार्ग त्यांनी सुचविलेही आहेत आणि त्यांची अंमलबजावणीही खूप नागरिक करीत आहेत. या उपायांमध्येच योगही आहे. योगाचा आणि मानसिक स्वास्थ्याचा निकटचा संबंध आहे. मन-शांती मिळविण्यासाठी योग आवश्यक आहेच. ‘योगश्च वृत्ती निरोधंह’ असे पुराणतही सांगितले आहे.

सध्याच्या लाइफस्टाइमध्ये मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आत्यंतिक गरजेचे आहे. कोरोनानंतरच्या कालखंडात जीवन, मृत्यू, यश-अपयश, एकटेपणा, नातेसंबंध यावर अधिक विचार आणि चर्चा होताना दिसत आहे. समाजात मोठ्या संख्येने अस्वस्थ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यातील अनेकजणांना कोणत्या तरी मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. काहीजण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. परंतु, ते धोकादायक आहे. सक्षम मनोवृत्तीतून त्यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी योग आणि त्यातून मिळणारी मन-शांतीचे मोल निरोगीय आयुष्यासाठी सर्वाधिक आहे. मन-शांती मिळाली तरी, शारीरिक व्याधी दूर राहते. म्हणूनच मन-शांतीची उपासना नियमित केली तर, शारीरिक व्याधींसाठी लसीकरण करण्याची गरज राहणार नाही.

कोणताही देश मजबूत केव्हा होतो तर, देशातील नागरिकांचे आरोग्य सक्षम असल्यासच. आपल्याकडे युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे. आपला समाज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्यदायी करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चा ‘सकाळ स्वास्थ्यम्’ हा उपक्रम अनोखा आहे. त्याचे उद्दिष्ट निरोगी, सदृढ आणि सक्षम समाज तयार करण्याचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हायलाच पाहिजे, त्याचबरोबर आपले कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांनीही त्यात सहभागी करून घेण्याची गरज आहे. सक्षम आरोग्यासाठी नागरिकांच्या मनात सूर्योदय करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चा हा उपक्रम निश्चित यशस्वी होणार, या बद्दल माझ्या मनात शंका नाही!

(शब्दांकन - मंगेश कोळपकर)

प्रवेशिका या ठिकाणी उपलब्ध?

काही कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव. प्रत्येक कार्यक्रमासाठी

स्वतंत्र प्रवेशिका आहेत. मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध.

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत

१. पंडित फार्मस् : गेट नं. २, डी. पी. रोड , कर्वेनगर, पुणे.   SIILC : सकाळनगर, बेसमेंट बाणेर रोड , पुणे.

२. सीझन्स मॉल : बाटा शोरूम समोरील प्रवेशद्वार, हडपसर, पुणे.   सकाळ हेड ऑफिस : ग्राउंड फ्लोअर, बुधवार पेठ, पुणे. 

३. सकाळ पिंपरी ऑफिस : बी-झोन बिल्डिंग पाचवा मजला , एम्पायर इस्टेट शेजारी, पिंपरी

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या!

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

Latest Maharashtra News Updates : गौतम अदानींना आणखी एक मोठा झटका, केनिया सरकारने 5 हजार कोटींचा करार रद्द केला

अक्कलकोटमध्ये शेतीच्या बांधावरुन ६० वर्षीय व्यक्तीचा खून! कुऱ्हाडीचे ४ घाव, पण डोक्यातील घावाने घेतला जीव; तिघांवर गुन्हा, दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT