Symptoms Of A Swollen Kidney  esakal
आरोग्य

Symptoms Of A Swollen Kidney : शरीरात सूज येण्याची वाट पाहू नका, वेळोवेळी किडनी तपासा

Pooja Karande-Kadam

Symptoms Of A Swollen Kidney : शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. जागतिक मूत्रपिंड दिनाच्या पार्श्वभूमीवर मूत्रपिंड आणि त्याची काळजी याविषयी आजपासून जाणून घेऊया.

साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असलेले रुग्ण किडनी तपासल्यानंतर अस्वस्थ होतात. शरीराला सूज नाही, मग किडनी कशाला तपासायची, असे अनेक रुग्ण सांगतात. किडनी खराब होऊ लागल्यावर शरीरात सूज येते याची रुग्णांना जाणीव करून द्यावी. (Kidney Health)

म्हणूनच, सूज येण्याची वाट न पाहता साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉलच्या बाबतीत वर्षातून एकदा तरी किडनी तपासली पाहिजे. त्यामुळे किडनीशी संबंधित आजारांच्या गंभीर धोक्यापासून रुग्णांना वाचवता येते.

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स इंडिया जबलपूर चॅप्टरने आयोजित केलेल्या मेडिसिन अपडेट 2023 मध्ये डॉ.डेंगरा यांनी सांगितले की, हृदयाच्या कवच बदलण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. हे ऑपरेशन टेलिस्कोपद्वारे लहान चीपद्वारे केले जाऊ शकते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या स्लीप एपनिया आजारात घोरण्यापासून आराम मिळू शकतो.

यामध्ये सी पॅप मशीन प्रभावी आहे. या यंत्राच्या मदतीने शरीरात साचलेला कार्बन डायऑक्साइड काढून टाकला जातो. त्यामुळे सुस्ती दूर होते, घोरण्यापासून आराम मिळतो आणि लठ्ठपणा, रक्तदाब, साखरही नियंत्रणात राहते. डॉक्टरांनी किडनीच्या आजारातही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे

  • लघवी अडकणे,

  • लघवी बंद होणे

  • वारंवार लघवी होणे

  • लघवीतून पू येणे

  • पोटात सतत दुखणे, चेहरा सुजणे

मूत्रपिंड विकार कसा होतो?

मूत्रपिंड विकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. या सर्वांत लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबेटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

यावर तातडीने उपचार केले नाही तर, मूत्रपिंडाचे काम पूर्ण थांबू शकते. मूत्रपिंडावर झालेला परिणाम हा तात्पुरता असल्यास त्यावर तातडीने उपचार करून त्याचे कार्य पूर्ववत करणे शक्य असते. परंतु, हळुहळू मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होत गेला आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर मूत्रपिंड वाचवणे अशक्य ठरते.

मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी

  • नियमित आरोग्य तपासणी करा

  • भरपूर पाणी प्या.

  • स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा.

  • आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.

  • फास्ट फूड टाळा.

  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

  • रक्तदाब-डायबेटीस असल्यास अधिक काळजी घ्या.

  • ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT