Health Care : महिला गर्भधारणा टाळण्यासाठी हल्ली इमरजंसी काँट्रासेप्टिव्ह पिल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र हे महिलेच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? या पिल्स घेणे सुरक्षित आहे का?
प्रत्येक महिलेचे आई होणे हे निश्चितच मोठे स्वप्न असते. मात्र करियर आणि अनेक प्रायोरिटीजमुळे अनेक महिलांना लवकर बेबी प्लानिंग करायचं नसतं. त्यामुळे अनेक महिला या सेफ सेक्सवर विश्वास ठेवतात. मात्र एवढ्या काळजीनंतरही अनेकदा महिल्या प्रेग्नेंट होतात. अशा वेळी त्या इमरजंसी पिल्सचा वापर करतात. मात्र हे करणे सुरक्षित आहे का? या संदर्भात तुमच्या सर्व शंका शारदा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या युनिट प्रमुख, प्राध्यापक आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. रूची श्रीवास्तव या दूर करतील. वाचा सविस्तर
का घेतात इमरजंसी पिल्स
इमरजंसी पिल्स या शब्दातूनच कळते जेव्हा इमरजंसी असेल तेव्हाच या पिल्स घेतल्या जातात. अर्थात एखाद्या स्त्रीने अनप्रोटेक्टेड सेक्स केल्यास कंसिव्ह करण्याचे चांसेस वाढतात. मात्र ती स्त्री आई बनण्यास सक्षम नसेल किंवा तयार नसेल तेव्हा या पिल्सचा वापर केला जातो.
इमरजंसी पिल्स घेणे सुरक्षित आहे काय?
जोपर्यंत तुम्ही इमर्जन्सी गोळी फक्त आणीबाणीच्या परिस्थितीत घेत आहात तोपर्यंत ती सुरक्षित आहे. पण एखादी महिला नियमितपणे इमर्जन्सी गोळी घेत असेल तर ते योग्य नाही. याचे कारण असे की ते स्वतःच हार्मोनसारखे कार्य करते. या गोळ्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही या प्रकारच्या इमरजंसी पिल्स सहा महिन्यांतून किंवा वर्षातून एकदा घेऊ शकता.
इमरजंसी पिल्सचे तोटे
अनियमित मासिक पाळी
जर तुम्ही इमर्जन्सी पिल्स नियमितपणे घेत असाल तर ते तुमच्या मासिक पाळीत अडथळा आणू शकते. असं असलं तरी इमर्जन्सी गोळी घेतल्याने अनेक महिलांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. इमर्जन्सी गोळ्या घेतल्याने जर एखाद्या महिलेची मासिक पाळी विस्कळीत होत असेल, तर ती गर्भवती आहे की नाही याबद्दल तिला अनेकदा काळजी वाटते. अशा प्रकारचा त्रास टाळण्यासाठी इमरजंसी पिल्सऐवजी संरक्षणाच्या इतर पद्धतींचा अवलंब करा म्हणजेच कंडोम वापरा.
गर्भधारणेची हमी नाही
बहुतेक कंडोम गर्भधारणा टाळण्यासाठी हमी देतात. याशिवाय तुम्ही औषध घेतल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते. म्हणजेच, आपत्कालीन गोळ्या गर्भधारणा टाळण्यासाठी 100% हमी देत नाहीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.