Water Tester Sakal
आरोग्य

Water Tester घरामध्ये येणारं पाणी पिण्यायोग्य आहे का? सविस्तर माहिती सांगेल हे छोटेसे यंत्र

तुम्ही पित असलेले पाणी पिण्यायोग्य आहे का? अशी तपासा पाण्याची गुणवत्ता…

Harshada Shirsekar

धरण, जलाशयांमधून थेट आपल्या घरामध्ये येणारे पाणी शुद्धच असेल याची खात्री देता येत नाही. म्हणूनच तज्ज्ञमंडळींकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे पाणीटंचाईच्या ठिकाणी तर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पण गढुळ पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही मोठ्या प्रमाणात उद्भवतात. जेथे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही, तेथे लोक चक्क आता फिल्टरयुक्त पाण्याची मागणी करत आहेत. 

अशातच तुम्ही पित असलेल्या बॉटलमधील पाण्याची गुणवत्ता तपासणे, आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे आणि खरंच हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. कदाचित बॉटलमधील पाणी गुणवत्ता चाचणीत फेल ठरू शकते.  

बॉटलमधील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? हे तपासण्यामध्ये एक छोटेसे यंत्र तुमची नक्कीच मदत करू शकते. या यंत्राचे नावे आहे टीडीएस मीटर, जे दिसायला अगदी थर्मामीटर प्रमाणे दिसते. या यंत्राचा वापर केल्यास तुमच्या ग्लासमधील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची माहिती मिळेल.

TDS मीटर कसे करतं पाण्याची तपासणी?

TDS मीटर पिण्याच्या पाण्यातील सोडिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमसहीत अन्य अजैविक पदार्थांची तपासणी करते. महत्त्वाचे म्हणजे हे यंत्र वजनाने इतके हलके आहे की आपण ते स्वतःसोबत घेऊन कोठेही प्रवास करू शकता. तसेच हे यंत्र वापरण्यासाठी विजेचीही आवश्यक नसते.  

TDS मीटरमधील कोणत्या रीडिंगपर्यंतचे पाणी पिण्यास असते योग्य? 

TDS मीटरमधील कोणत्या रीडिंगपर्यंतचे पाणी पिण्यासाठी योग्य असू शकते, हा मुख्य प्रश्न आहे. TDS मीटरमधील 300 मिलीग्रॅमपर्यंतचे पाणी पिण्यासाठी योग्य मानले जाते. म्हणजे एक लिटर पाण्याची गुणवत्ता आपण तपासत असाल तर यामध्ये 300-600 मिलीग्रॅम रीडिंग आले तर ते पाणी आपण पिऊ शकतो. पण हेच रीडिंग 900 मिलीग्रॅमपर्यंत पोहोचले तर ते पाणी पिण्यायोग्य नाही, हे लक्षात घ्यावे.

GLUN या ब्रँडचे टीडीएस मीटर टेस्टर आपण घेऊ शकतो

या डिव्हाइसचे फीचर आपण जाणून घेऊया 

TDS रेंज : 0 - 990ppm (mg/L), अ‍ॅक्युरसी  : +/- 2%

  • TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ह्ड सोलिड्स याचा अर्थ असा की पिण्याच्या पाण्यात एकूण विरघळलेले घन पदार्थ. ज्यामध्ये अजैविक क्षार, सेंद्रिय पदार्थांचा समावेश असतो. यामध्येही कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम इत्यादी घटक असतात. 

  • 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त पातळी असलेल्या पाण्यामध्ये डिव्हाइस बुडवू नये. 

  • हे डिव्हाइस सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • बॅटरी : 2x LR44

किंमत - 175 रूपये येथे खरेदी करू शकता डिव्हाइस

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT