Influenza  sakal
आरोग्य

इन्फ्लुएंझाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग : तज्ज्ञ

इन्फ्लुएंझा हा श्वसनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव असून, सर्व वयोगटांतील लोकांना याची लागण होऊ शकते

सकाळ डिजिटल टीम

इन्फ्लुएंझा म्हणजे काय?

इन्फ्लुएंझा हा श्वसनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव असून, सर्व वयोगटांतील लोकांना याची लागण होऊ शकते. इन्फ्लुएंझासाठी वार्षिक लसीकरण हा सर्वांत सुरक्षित व प्रभावी मार्ग असून, यामुळे फ्लूशी संबंधित गुंतागुंतींच्या जोखमी ७० ते ९० टक्क्यांनी कमी होतात. (the best way to prevent influenza is to get vaccine)

इन्फ्लुएंझा हा लसीकरणाने टाळता येतो?

२०२०च्या एप्रिल ते जून या कालावधीत भारतात तीव्र स्वरूपाच्या श्वसन प्रादुर्भावाच्या रुग्णांची संख्या ७७८,०७० होती. सुदैवाने, यापूर्वी लसीकरणाच्या मदतीने देशाने अनेकविध संसर्गजन्य आजारांवर मात केली आहे. इन्फ्लुएंझा हा लसीकरणाने टाळता येण्याजोगा आजार आहे.

लक्षणे

भारतात पावसाळा किंवा कडक हिवाळ्यामध्ये ऋतूकालीन इन्फ्लुएंझा किंवा ‘फ्लू’चा उद्रेक दिसून येतो. इन्फ्लुएंझा सर्व वयोगटांतील लोकांना होऊ शकतो. मधुमेह, मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताचे विकार, दमा, रक्ताचे आजार किंवा यांसारख्या सहव्याधी असलेले लोक तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेले लोक यांना या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते.

लसीकरण प्रभावी उपाय

लहान मुलांसाठी तसेच धोक्याखालील प्रौढांसाठी लसीकरण हा इन्फ्लुएंझा व त्याच्याशी निगडित वाईट परिणाम टाळण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. डब्ल्यूएचओनेही (WHO) सर्व धोक्याखालील गटांसाठी, प्रचलित नवीनतम फ्लू स्ट्रेनचा समावेश असलेल्या, इन्फ्लुएंझाच्या वार्षिक लशीची शिफारस केली आहे.

लहान मुलांसाठीचे फ्लू शॉट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, तर प्रौढांमध्ये, अगदी मधुमेह व हायपरटेन्शनसारख्या सहव्याधींनी ग्रस्त प्रौढांमध्येही, इन्फ्लुएंझा लस घेण्याचे प्रमाण कमी आहे. मधुमेही व्यक्तींमध्ये इन्फ्लुएंझाची लस घेतलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होण्याचे प्रमाण, लस न घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत, ५६ टक्के कमी आहे तसेच रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ५४ टक्के कमी आहे.

भारत ही आता जगाची मधुमेह राजधानी समजली जात आहे, भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ७४ दशलक्ष झाली आहे. अशा परिस्थिती लसीकरणाचे प्रमाण वाढल्यास या मोठ्या लोकसंख्येला त्याचा लाभ होणार आहे.

मुंबई येथील डॉ. कोविल्स डायबेटिस केअर सेंटर्समधील कन्सल्टण्ट डायबेटॉलॉजिस्ट डॉ. राजीव कोविल यांनी, इन्फ्लुएंझा लसीकरणाच्या गरजेबाबत सांगितले, “मुंबईमध्ये आम्ही जे इन्फ्लुएंझाचे प्रौढ रुग्ण बघतो, त्यातील ६० टक्के रुग्णांना कायमस्वरूपी आजार असतात आणि त्यामुळे त्यांना सौम्य ते तीव्र असे परिणाम सहन करावे लागतात. असे प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वांत सुरक्षित व सर्वांत प्रभावी पर्याय आहे.”

अबटमधील मेडिकल अफेअर्स विभागाचे संचालक श्री. जेजो करनकुमार म्हणाले, “लोकांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निरोगी राहण्यात मदत करण्यासाठी आम्ही अबॉटच्या माध्यमातून वचनबद्ध आहोत. इन्फ्लुएंझाच्या वार्षिक लसीकरणाबाबत, केवळ लहान मुलांमध्ये नव्हे, तर धोक्याखालील प्रौढांमध्येही जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सर्व लोकसंख्येला अधिक चांगले संरक्षण पुरवणे ही याची गुरूकिल्ली आहे. फ्लू शॉट मिळणे सोपे व सोयीस्कर व्हावे यासाठी फ्लू लसीकरण सेवा लोकांच्या घरी जाऊनही दिली जाते. इन्फ्लुएंझा हा लसीकरणाने टाळता येण्याजोगा आजार असून, प्रतिबंधातील सुलभता व लाभ हे आजारात निर्माण होऊ शकणाऱ्या गुंतागुंतींच्या तुलनेत बरेच कमी आहेत.”

इन्फ्लुएंझाचे स्ट्रेन्स दरवर्षी म्युटेट होतात. सध्या प्रसारात असलेल्या विषाणूच्या स्ट्रेनबद्दल डब्ल्यूएचओ सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते. हे केवळ लहान मुलांसाठी नाही, तर प्रौढांसाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांनी दरवर्षी डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्फ्लुएंझा लस घेणे आवश्यक आहे.

सध्याचे जागतिक संदर्भ अनेकांना गोंधळात टाकणारे आहेत. इन्फ्लुएंझा व श्वसनाच्या अन्य प्रादुर्भावांची लक्षणे म्हणजेच ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा, डोकेदुखी, नाक गळणे, स्नायूदुखी आदी समान असल्यामुळे हे होते. कोविड-१९ लसीकरण फ्लूपासून संरक्षण करणार नाही आणि फ्लूची लस कोविड-१९चा प्रतिबंध करणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

फ्लू लशी आणि कोविड-१९ लशी एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात, त्या परस्परांच्या सुरक्षितता रूपरेखेवर तसेच परिणामकारकतेवर प्रभाव टाकत नाहीत. प्रौढांसाठी लसीकरण केंद्र जानेवारी २०१८ मध्ये भारतात स्थापन करण्यात आले आणि असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियाच्या अलीकडील काळातील लसीकरणाच्या शिफारशी या जागरूकता वाढवणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवणे यासाठीच्या उपायांप्रमाणे काम करत आहेत.

लसीकरण कुटुंब, मित्रमंडळी व समाजातील सदस्यांना अनेक स्तरीय संरक्षण पुरवते. लसीकरणाची व्याप्ती देशभर वाढवण्याच्या माध्यमातून व्यक्ती फ्लूशी निगडित गुंतागुंती टाळू शकतात व आरोग्य व्यवस्थेला सहाय्य करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT