Uapvas Food sakal
आरोग्य

उपवासाची प्रथा

नवरात्र हा सण हा भक्तिपूर्ण, आध्यात्मिक आणि उत्साहाचा सामाजिक समारंभ आहे. आज त्याची सांगता होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

नवरात्र हा सण हा भक्तिपूर्ण, आध्यात्मिक आणि उत्साहाचा सामाजिक समारंभ आहे. आज त्याची सांगता होत आहे. प्रार्थना, कर्मकांडं यांच्याबरोबरच बरेच भक्त या काळात उपवास धरतात. काहीजण विशिष्ट पदार्थांचे बंधन ठेवून, काहीजण ठरावीक काळासाठी, तर काही संपूर्ण कालावधीसाठी (नऊ दिवस) उपवास करतात. यापुढेही सणासुदीच्या निमित्ताने उपवास होणार आहेत. त्या संदर्भात आरोग्य आणि पोषण यांचे पैलू उलगडून बघूया.

उपवासाचे फायदे

सुधारित चयापचयाचे आरोग्य - काही वेळासाठी किंवा मधूनमधून उपवास केल्यास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे विशेषतः टाइप-२ मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी फायद्याचे ठरते. संशोधन सांगते, की उपवास शरीराची रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता वाढून इन्सुलिनचा प्रतिकार कमी करतो.

वजननियंत्रण - उपवास, विशेषतः मधूनमधून केलेला असल्यास एकंदर कॅलरीजचे सेवन कमी प्रमाणात होऊन वजन कमी होते. फळे-भाज्या यांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते; सोबत शारीरिक क्रियाकलाप केले गेल्यास मांसपेशीची हानी होण्यापासून बचाव होतो.

सुधारित पचनक्रिया - हलक्या आहारामुळे पचन आरोग्य सुधारते. तळलेले व प्रक्रिया केलेले अन्न टाळल्याने पोट फुगणे, अस्वस्थता कमी होऊन पचनसंस्थेचे कार्य जास्त प्रभावीपणे होते.

मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्वास्थ्य - उपवासाच्या आध्यात्मिक पैलूचा हलक्या आहाराबरोबर झालेला परिणाम म्हणजे मानसिक स्पष्टता व एकाग्रता वाढते. याकाळात भावनिकरित्या बरेच समतोल आणि एकाग्र वाटत असल्याचे बऱ्याच व्यक्तींचे म्हणणे आहे. कारण जास्त आणि जडान्न खाऊन येणारे जडत्व या काळात असत नाही.

आरोग्याचे संभाव्य धोके

उपवासामुळे आरोग्यासाठी काही फायदे मिळू शकत असले, तरी व्यवस्थितपणे सांभाळले न गेल्यास काही संभाव्य गैरफायदेही आढळून येतात.

पोषणतत्त्वांची कमतरता - उपवासादरम्यान काही विशिष्ट पदार्थ टाळले गेल्याने प्रथिने, लोह आणि काही विशिष्ट प्रकारची ‘ब’ जीवनसत्त्वे यांसारख्या पोषणतत्त्वांचा अभाव होण्याची संभावना असते. खासकरून, आहारात विविधता आणि समतोल नसेल तर.

थकवा आणि अशक्तपणा - कमी कॅलरीज खाल्ल्या गेल्याने शारीरिक ऊर्जेचे प्रमाण कमी होऊ शकते. सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ किंवा पिष्टमय भाज्या यांसारखे पदार्थ खाल्ले न गेल्यास थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

अव्यवस्थित खाणे - उपवास करताना कधीकधी खाण्याच्या चुकीच्या सवयी लागू शकतात. प्रमाणित खाण्याचा उपवास आणि उपवास संपल्यानंतरचे खाणे काही वेळेस, जास्त खाणे किंवा कमी खाणे यांसारख्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयी लावू शकते. उपवास करताना समतोल साधणे महत्त्वाचे असते. केवळ खाण्याच्या मर्यादेकडे लक्ष न देता उपवासाचा आध्यात्मिक संबंधही असतो याकडेही लक्ष द्यावे.

ठरावीक लोकांना धोका - मधुमेह, हृदयविकार किंवा रक्तदाब यांसारखी आरोग्याची पूर्वस्थिती असलेल्या लोकांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतरच काळजीपूर्वक उपवास करावा. जास्त काळाच्या उपवासामुळे हायपोग्लायसेमिया (रक्तशर्करा कमी होणे) किंवा इलेक्ट्रोलाईटचे असमतोलत्व यासारखे धोकादायक परिणाम होऊ शकतात. उपवास सुरू करण्यापूर्वी, विशेषतः मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, मूत्रपिंड किंवा यकृताच्या वैद्यकीय स्थिती असल्यास डॉक्टर आणि आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे.

उपवास आणि शारीरिक क्रियाकलाप बरोबरीने काम करून आध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढते. उपवास कदाचित ऊर्जा कमी करतो; परंतु थोड्या प्रमाणातील शारीरिक क्रियाकलापाने चयापचय क्रिया वाढून मांसपेशींची ताकद वाढते व एकंदर आरोग्यास मदत होते. चालणे, स्ट्रेचिंगचे व्यायाम किंवा नृत्य यांसारखे साधे व्यायामदेखील मांसपेशीची क्षती न होता रक्तप्रवाह सुधारतात ज्याने डिटाॅक्सिफिकेशनला मदत होते. शारीरिक क्रिया उपवास काळात एन्ड्रोफिन्स पसरवतात- ज्यामुळे मनःस्थिती सुधारून उपवास काळातील तणाव कमी होतो.

उपवास आणि शारीरिक क्रियाकलापांचा समतोल साधण्यासाठी हायड्रेटेड राहणे, पोषणतत्त्वांनी परिपूर्ण जेवण उपवास सोडताना खाणे आणि स्वतःच्या शरीराचे ऐकणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT