the negative effects painkillers have on your body health Sakal
आरोग्य

Painkillers : वेदनाशामक औषधे घेताना..!

सकाळ वृत्तसेवा

डॉ. अजय कोठारी /डॉ. सिंपल कोठारी

वेदनाशामक औषधे ही वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात. ही औषधे वेदनेचे आपल्या मेंदूकडे जाणारे सिग्नल रोखतात. त्यामुळे आपणास वेदनांची जाणीव होत नाही. वेदनाशामक औषधे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत. गोळ्या कॅप्सूल, मलम, इंजेक्शन.

रुग्ण डॉक्टरांकडे अनेकदा कुठेतरी दुखत असेल, तेव्हाच जातो. डॉक्टर वेदनाशामक औषधे लिहून देतात. काही रुग्ण परत दुखायला लागल्यास तीच औषधे पुन्हा घेतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. जास्त दिवस वेदनाशामक औषधे घेणे शरीराला अपायकारक असते. काही लोकांना त्याची सवय लागते व ते वर्षानुवर्षे औषधे घेतात.

हाडांचे दुखणे आणि डोकेदुखी

पोटदुखीवर वेगवेगळी वेदनाशामक औषधे दिली जातात. काही सौम्य स्वरूपाचे दुखणे असल्यास कमी क्षमता असलेली वेदनाशामक औषधे दिली जातात. काहींना तीव्र दुखत असल्यास लवकर आराम मिळण्यासाठी इंजेक्शन स्वरूपात औषधे दिली जातात.

ही औषधे फार दिवस म्हणजे वर्षानुवर्षे घेतल्याने आम्लपित्त, किडनीवर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घ्यावीत व जितक्या कालावधीसाठी सांगितली आहे तेवढ्या पुरतीच घ्यावी.

ओपीअम प्रकारात मोडणारी वेदनाशामक औषधे कर्करोगापासून होणाऱ्या वेदना कमी करण्यात उपयोगी ठरते. ज्या लोकांना दीर्घकाळ वेदनाशामक औषधांची आवश्यकता भासते, त्यावर आता अॅलोपथी व आयुर्वेद यामध्ये संशोधन सुरू आहे. अॅलोपॅथीला डोस कमी करण्यासाठी या औषधांमध्ये आयुर्वेदिक व होमिओपॅथीचे औषधे मिश्रण केले जात आहे.

वेदनाशामक औषधी ही तात्पुरती असतात. रुग्णाला वेदनारहित जीवन जगण्यास मदत करतात. परंतु अनेक रूग्ण मूळ आजारावर उपचार न करता ती दीर्घकाळ खात राहतात, त्याचा विपरीत परिणाम होतो.

महत्त्वाची बाब म्हणजे परदेशात ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाहीत. भारतात बहुतांश रुग्ण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी, खोकला, सांधेदुखी, डोकेदुखीचे उपचार थेट घेतात.

आणि त्या औषधांची त्यांना सवय लागते. आपल्या देशात अनेक ठिकाणी आयुर्वेदिक व होमीओपॅथी औषधांच्या नावाखाली वेदनाशामक औषधी वर्षानुवर्षे दिले जातात. त्या गोळ्या सुट्या मिळतात. त्यातील व त्यामध्ये काय कन्टेंट आहे, हे काही लिहिलेले नसते. त्यामुळे ती घेताना त्याची सत्यता जाणून घेणे गरजेचे असते.

वेदनाशामक औषधांमुळे होऊ शकणारे अपाय...

  • किडनी निकामी होणे.

  • पोटात अल्सर होणे

  • हृदयावर ताण येणे

  • हाडे ठिसूळ होणे

  • यकृत निकामी होणे

  • बद्धकोष्ठता

  • पचनक्रियेत अडचणी इत्यादी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT