Health Care  esakal
आरोग्य

Health Care : हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्राऊन राईस, आजच करा आहारात समावेश

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते. शिवाय, या ब्राऊन राईसवर जास्त प्रक्रिया देखील केली जात नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : निरोगी आरोग्य हवे असेल, तर तुम्हाला त्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करावा लागेल. या दोन्हींची सांगड घातली की, तुमचे आरोग्य उत्तम राहते. परंतु, आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, अपुरा आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरू झाल्या आहेत.

या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात काही निरोगी खाद्यपदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यासोबतच नियमित व्यायाम, योगा आणि मेडिटेशन करणे देखील फायद्याचे आहे. निरोगी खाद्यपदार्थांमध्ये ब्राऊन राईसचा देखील समावेश आहे.

या ब्राऊन राईसमुळे वजन कमी करण्यास मदत होते. यासोबतच याचे इतर अनेक फायदे आहेत. आज आपण ब्राऊन राईसच्या या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

ब्राऊन राईस खाण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

ब्राऊन राईसचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ब्राऊन राईसमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर पोषकघटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे सर्व घटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि आपल्याला तंदूरूस्त ठेवतात. जर तुम्हाला ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर तुमच्या आहारात ब्राऊन राईसचा समावेश अवश्य करा.

मधुमेहासाठी लाभदायी

जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या आहारात ब्राऊन राईसचा अवश्य समावेश करा. मधुमेहाच्या रूग्णांनी ब्राऊन राईसचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास खूप मदत होते. खास करून टाईप-२ मधुमेह असणाऱ्यांनी ब्राऊन राईसचे सेवन अवश्य करावे. डॉक्टर अनेकदा मधुमेहाच्या रूग्णांना ब्राऊन राईसचे सेवन करण्याचा सल्ला देखील देतात.

हृदयासाठी फायदेशीर

ब्राऊन राईसमध्ये फायबर्स आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या दोन्ही प्रमुख घटकांमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हृदयविकाराच्या धोक्यापासून बचाव करण्याचे काम मॅग्नेशिअम करते. त्यामुळे, तुमच्या आहारात ब्राऊन राईसचा अवश्य समावेश करा. यामुळे, तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT