Health Care  esakal
आरोग्य

Health Care : हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या बाजरीचा आहारात समावेश असणे फायद्याचे आहे. बाजरीमध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या बाजरीचा आहारात समावेश असणे फायद्याचे आहे. बाजरीमध्ये फायबर, प्रथिने आणि जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. खास करून हिवाळ्यात बाजरीचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते.

बाजरी हे धान्य उष्ण आहे, त्यामुळे, हिवाळ्यात या बाजरीच्या भाकरीचे सेवन करण्यावर लोकांचा भर असतो. हिवाळ्यात आपल्या शरीराला ऊब मिळणे आवश्यक असते. त्यामुळे, बाजरीचे सेवन केले जाते.

बाजरीची भाकरी ही चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठी लाभदायी आहे. त्यामुळे, अनेक जण या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी आवर्जून खातात. आज आपण बाजरीचे आरोग्यदायी फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

मधुमेहींसाठी लाभदायी

बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. त्यामुळे, बाजरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी बाजरीचे सेवन करणे हे अतिशय लाभदायी आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा जरूर समावेश करावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि इतर पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे, जर तुम्ही बाजरीचे नियमितपणे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

शिवाय, हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन केले तर आपले शरीर आतून ऊबदार राहण्यास मदत होते. ज्यामुळे, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या दूर राहू शकतात. त्यामुळे, तुमच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा आणि बाजरीपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा जरूर समावेश करा.

पचनक्षमता सुधारते

बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर आढळून येते. हे डायटरी फायबर आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत जसे की, पोटदुखी, पोट फुगणे, पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या असतील तर तुमच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा आणि बाजरीपासून बनवलेल्या पदार्थांचा जरूर समावेश करा. यामुळे, तुमच्या पोटाच्या समस्या दूर होऊन पचनक्षमता सुधारण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT