Hot Chocolate Benefits esakal
आरोग्य

Hot Chocolate Benefits : हिवाळ्यात हॉट चॉकलेट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

हिवाळा सुरू झाला की आपण आरोग्याची खास काळजी घेतो. वातावरणातील थंडावा दूर करण्यासाठी आणि शरीराला उष्णता मिळावी यासाठी, आपण अनेक प्रयत्न करतो. हिवाळ्यात अनेक जण त्यांच्या आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hot Chocolate Benefits : हिवाळा सुरू झाला की आपण आरोग्याची खास काळजी घेतो. वातावरणातील थंडावा दूर करण्यासाठी आणि शरीराला उष्णता मिळावी यासाठी, आपण अनेक प्रयत्न करतो. या दिवसांमध्ये अनेक जण सकाळच्या कोवळ्या ऊन्हात बसून शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तर काही जण आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करतात, जेणेकरून शरीराला उष्णता मिळावी.

या दिवसांमध्ये चहा, कॉफी सोबत कित्येक जण कपामध्ये हॉट चॉकलेटचे सेवन करतात. हे हॉट चॉकलेट तुम्हाला फक्त आतून गरम ठेवत नाही, तर तुमच्या शरीराला ते अनेक दृष्टींनी फायदेशीर आहे. हॉट चॉकलेटचे सेवन करण्याचे फायदे कोणते आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

हृदयासाठी फायदेशीर

उत्तम प्रतीच्या कोको आणि दूधाने जेव्हा हॉट चॉकलेट बनवले जाते, तेव्हा ते पोषकघटकांनी परिपूर्ण आणि समृद्ध असते. फ्लेव्होनॉईड्सने युक्त असलेले हे हॉट चॉकलेटमधील पोषकघटक आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे, ज्या लोकांना हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांना हॉट चॉकलेटचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देताना दिसतात.

मूड सुधारण्याचे करते काम

थंडीच्या दिवसांमध्ये किंवा हिवाळ्यात हॉट चॉकलेटचे सेवन केल्यास आपला उत्साह किंवा मूड सुधारण्याचे कामात हॉट चॉकलेट मदत करते. जेव्हा आपण हॉट चॉकलेटचे सेवन करतो त्यावेळी एंडॉर्फिन या फिल-गुड हार्मोनचे उत्पादन उत्तेजित होऊ शकते. ज्यामुळे, आपला मूड सुधारण्यास मदत होते आणि आपले आरोग्य चांगले राहते.

हाडांना देते बळकटी

दूधापासून बनवण्यात आलेल्या हॉट चॉकलेटमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. या कॅल्शिअममुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. हॉट चॉकलेटचे सेवन केल्याने हाडांना बळकटी देखील मिळते. ज्या लोकांना कॅल्शिअमची समस्या आहे किंवा ज्यांच्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात हॉट चॉकलेटचा जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT