Back Pain : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी या अनेक समस्यांचे कारण बनू शकतात. या समस्यांमध्ये पाठदुखी, खांदेदुखी, मानेमध्ये वेदना होणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे. या सवयींमध्ये चुकीच्या पद्धतीने वाकून काहीतरी उचलणे, झोपण्याची स्थिती, व्यायाम न करणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर या समस्या आणखी गंभीर होऊ शकतात.
जर तुम्ही चुकीच्या पद्धतीमध्ये काही काम करत असाल तर याचा थेट परिणाम आपल्या पाठीच्या मणक्यावर होतो. केवळ चुकीच्या पद्धतीमध्ये बसणे नाही तर इतर अनेक चुकीच्या सवयी पाठदुखीसठी कारणीभूत ठरू शकतात. कोणत्या आहेत या चुकीच्या सवयी? चला तर मग जाणून घेऊयात.
मोबाईलचा जास्त वापर केल्याने पाठदुखी, खांदेदुखी आणि मानेमध्ये वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. अनेकदा आपण मोबाईलवर बोलण्यात किंवा मोबाईल पाहण्यात इतके व्यस्त होतो की आपण कोणत्या स्थितीमध्ये बसलो आहोत? याकडे आपले लक्ष जात नाही.
फोनमध्ये जास्त वेळ पाहताना सतत मान वाकवणे, सरळ बसण्याऐवजी झोपणे इत्यादी सवयी तुमच्या मणक्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीत. मोबाईलच्या या सवयीमुळे पाठदुखी, खांदेदुखी आणि मानेमध्ये वेदना होण्याचे प्रमाण आणखी वाढते.
जर तुम्ही तंबाखू खात असाल किंवा स्मोकिंग करत असाल तर तर वेळीच ही धूम्रपानाची सवय थांबवा. कारण, धूम्रमान केल्याने तुम्हाला पाठ आणि कंबरदुखीचा धोका हा धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढतो. धूम्रपान केल्याने याचा परिणाम केवळ फुफ्फुस किंवा श्वसनावर होत नाही तर, हाडांवर आणि पाठीच्या मणक्यावर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे, धूम्रपान करू नका.
काही लोक ऑफिसला जाताना ऑफिसच्या बॅगमध्ये भरपूर सामान घेऊन प्रवास करतात. प्रवास करताना ही ऑफिसची बॅग खांद्यावर घेतली जाते. त्यामुळे, बॅगेतील सामानाचा सर्व भार खांद्यावर घेतला जातो. एवढा भार खांद्यावर घेऊन प्रवास करणे किंवा चालणे हे मणक्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
मणक्यासोबतच तुमच्या खांद्यामध्ये देखील यामुळे वेदना होण्याची शक्यता असते. यावर उपाय हा आहे की, शक्य असल्यास तुमची बॅग खाली ठेवा किंवा सामान एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करत राहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.