Green Vegetables  esakal
आरोग्य

Green Vegetables : कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी 'या' हिरव्या पालेभाज्यांचा आहारात करा समावेश

हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Green Vegetables : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि व्यायाम अतिशय आवश्यक आहे. परंतु, सध्याचे धकाधकीचे जीवन आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आजकाल शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, मग रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ शकतो. कॉलेस्ट्रॉल वाढले की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्त योग्य प्रकारे पोहोचले जात नाही. त्यामुळे, शरीरात वेदनांसोबतच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये कॉलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी करणे महत्वाचे आहे.

आज आपण अशा हिरव्या पालेभाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील वाढलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

पालक

पालकमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, ही हिरवी पालेभाजी खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. हिरवीगार पालक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पालकमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, पालकचा आहारात अवश्य समावेश करावा. पालकचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. पालकची भाजी खाण्यासोबतच तुम्ही पालकचे सूप, आणि सॅलेड ही बनवू शकता.

ब्रोकोली

ब्रोकोलीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. ही हिरवी पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर्सचे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ब्रोकोलीचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

ब्रोकोलीमध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे आपली पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे, ब्रोकोलीचा आहारात अवश्य समावेश करा.

मूळा

मूळा खायला सर्वांनाच आवडतो असे नाही. मात्र, मूळा ही पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मूळ्यामध्ये अँटीइंफ्लेमेंटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे, शरीरातील वाढलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील मूळा फायदेशीर आहे. या हिरव्या पालेभाजीची भाजी देखील केली जाते. भाजीसोबतच तुम्ही मूळ्याचा वापर हा सॅलेडमध्ये आणि अन्य स्वरूपात देखील करू शकता. निरोगी हृदयासाठी देखील मूळा फायदेशीर आहे. त्यामुळे, आहारात मूळ्याचा अवश्य समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT