आपणही निरोगी जीवन जगावे आणि कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हृदयविकाराचा झटका आणि कॅन्सर यांसारख्या जीवघेण्या आजारांमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कायमचे गमावल्याचे आपण पाहिलेच असावे.
बरं या सर्व आजारांची लागण कोणतीही पूर्वकल्पना देऊन होत नाही. पण आरोग्याशी संबंधित काही आवश्यक तपासण्या योग्य वेळेस केल्यास नक्कीच गंभीर आजारांवर मात करणे शक्य होऊ शकते. वेळेवर उपचार केल्यास आपले प्राण नक्कीच वाचू शकतात.
या लेखाच्या माध्यमातून आपण सहा रक्त तपासण्यांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे योग्य वेळेतच आजारांवर मात करणे शक्य होऊ शकते. वयाची तिशी ओलांडल्यानंतर आपण नियमितपणे काही तपासण्या करण्यास सुरुवात केली तर तुमच्या शरीराचे कित्येक गंभीर आजारांपासून संरक्षण नक्कीच होईल. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
1. लिपिड प्रोफाइल रक्त चाचणीद्वारे (lipid profile blood test) शरीरातील चांगल्या आणि खराब कोलेस्टेरॉलबाबतची माहिती मिळते. या चाचणीच्या माध्यमातून रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज व हृदयविकाराच्या धोक्याबाबतही माहिती मिळते.
2. व्हर्टिकल ऑटो प्रोफाइल टेस्ट (vertical auto profile (vap) test) - ही कोलेस्ट्रॉल, लिपिड आणि लिपोप्रोटीनशी संबंधित चाचणी आहे, जी लिपिड प्रोफाइलच्या सर्व घटकांचे मोजमाप करते व कोलेस्टेरॉलच्या अन्य प्रकारांबाबतच्या स्थितीबद्दलही रिपोर्टद्वारे माहिती देते. तुमच्या शरीरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या आजारांचा अनुवांशिक इतिहास आढळल्यास व्हीएपी चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
3. सी-रिअॅक्टिव प्रोटीन टेस्ट (सीआरपी) (C Reactive Protein Test) - लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोमग्रस्त रूग्णांमध्ये CRPची पातळी अधिक असते. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि एथेरोजेनिक डिस्लिपिडेमिया यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. सी-रिअॅक्टिव प्रोटीन टेस्टमुळे याच आजारांबाबतीच माहिती मिळते.
4. होमोसिस्टीन टेस्ट (Homocysteine Test) - शरीरातील होमोसिस्टीनच्या मात्रेत वाढ झाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अल्झायमर रोग आणि ऑस्टियोपोरोसिस यासह इतर अनेक रोगांचाही धोका वाढण्याची शक्यता असते. ही टेस्ट केल्यास आपण या सर्व आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
5. हिमोग्लोबिन A1C टेस्ट (Haemoglobin A1C Test) - महिनाभरात अथवा आठवड्यात रक्तातील साखरेची पातळी किती चांगल्या प्रकारे नियंत्रित आहे किंवा बिघडलीय, याबाबतची माहिती हिमोग्लोबिन A1C टेस्टद्वारे मिळते. या टेस्टच्या रिपोर्टच्या आधारे किडनीवर किती ताण येत आहे, याचीही माहिती समोर येते.
6. व्हिटॅमिन डी-3 (Vitamin D 3 Test)- शरीरातील व्हिटॅमिन डी-3च्या कमतरतेमुळे स्ट्रोक, अल्झायमर डिमेंशिया, धमण्यांचे रोग आणि कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका वाढतो. या आजारांपासून वेळीच स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर व्हिटॅमिन डी - 3 ची टेस्ट करून घ्यावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.