Tips to Avoid Pollution esakal
आरोग्य

Air Pollution : शहरांसह गावांमध्येही वाढतंय हवेचं प्रदूषण; धोका टाळण्यासाठी कामी येतील 'या' टिप्स

वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Avoid Air Pollution : जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताची राजधानी दिल्ली अव्वल स्थानावर आहे. दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. हिवाळ्यात तर या प्रदूषणाची पातळी कित्येक पटींनी वाढते.

आता दिल्ली पाठोपाठ मुंबई शहरामध्ये आणि काही उपनगरांमध्ये, ही हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. दरम्यान, स्विस ग्रुप IQ AIR च्या आकडेवारीनुसार देशाची राजधानी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या ३ शहरांचा जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये समावेश झाला आहे.

या वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे, प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आज आपण काही टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत.

स्वच्छ पाणी प्या

हवेतील प्रदूषण, धुके आणि धूरामुळे पाणी देखील प्रदूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा पाणी पिता तेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे, या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी पाणी फिल्टर केल्यानंतरच प्यावे.

प्राणायाम करा

प्राणायामचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. श्वसना संबंधीचे आजार रोखण्यासाठी नियमित प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो. प्राणायाम केल्यामुळे फुफ्फुसांना मजबूती मिळण्यास मदत होते.

प्रदूषणापासून वाचण्यासाठी तुम्ही नियमित प्राणायम करणे गरजेचे आहे. प्राणायामचे प्रकार जसे की कपालभाती, अनुलोमविलोम हे नियमितपणे करा. यासोबतच व्यायामाचा सराव देखील करा.

व्हिटॅमिन सी

प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्वाचे आहे. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला त्या प्रमाणे संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरते.

यासाठी, तुम्ही व्हिटॅमीन सीने युक्त असलेली फळे, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि प्रदूषणापासून बचाव करण्यास तुम्हाला मदत होऊ शकेल.

मास्कचा वापर अवश्य करा

कोरोना महामारीमुळे सर्वांनी मास्क घालण्यास सुरूवात केली. परंतु, कोरोना गेल्यानंतर अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत. लोकांनी मास्क घालणे बंद केले आहे.

मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे होणारे आजार आणि इतर समस्या टाळण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. प्रदूषण, धुर आणि धुके यांचा प्रभाव टाळण्यासाठी तुम्ही मास्कचा वापर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT