Toe Exercises  esakal
आरोग्य

Toe Exercises : हिवाळ्यात पायाच्या बोटांमध्ये क्रॅम्प्स येतात? मग, ‘हे’ व्यायाम केल्याने मिळेल आराम

Monika Lonkar –Kumbhar

Toe Exercises : थंडीच्या दिवसांमध्ये पायांमध्ये क्रॅम्प्स येणे, पायांमध्ये वेदना होणे या समस्या सुरू होतात. आजकाल लोकांमध्ये संधिवाताची समस्या वाढली आहे. या संधिवाताचा परिणाम तुमच्या पायांवर देखील होऊ शकतो. संधिवाताचा परिणाम पायांवर झाल्यास तुमच्या बोटांमध्ये वेदना होणे, पायांची बोटे सुजणे, बोटांमध्ये क्रॅम्प्स येणे इत्यादी समस्या सुरू होतात.

थंडीच्या दिवसांमध्ये या समस्या सुरू झाल्यामुळे पायांची हालचाल होणे बंद होते. पायांची बोटे देखील नीट हलवता येत नाही. त्यामुळे, पायांमध्ये आणि बोटांमध्ये बधिरपणा येण्याची शक्यता असते. या स्थितीमध्ये तुम्ही पायांच्या व्यायामाची मदत घेऊ शकता.

पायांचा व्यायाम केल्याने तुमच्या या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकेल. मात्र, सुरूवातीला हलके आणि सोपे व्यायाम करण्यावर भर द्या. यामुळे, हळूहळू पायांची लवचिकता वाढवण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात या व्यायाम प्रकारांबद्दल.

पायाचा अंगठा खेचा

पायांची बोटे खेचण्याचा व्यायाम करणे हा एक चांगला स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार आहे. नव्याने शिकणाऱ्या लोकांसाठी हा व्यायाम प्रकार बेस्ट आहे. हा व्यायाम केल्यामुळे पायाच्या अंगठ्यामध्ये आणि बोटांमध्ये लवचिकपणा वाढण्यास मदत होते.

कसे करायचे ?

तुमचा जो पाय दुखतो किंवा ज्या पायाच्या बोटांमध्ये क्रॅम्प्स आले आहेत. तो पाय स्टूल किंवा खुर्चीवर स्थिर ठेवा. आता हाताने तुमच्या पायाची बोटे धरा आणि हलक्या हाताने पायाची बोटे खेचण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या पायाला थोडा ताण जाणवेपर्यंत ही बोटे खेचण्याचा प्रयत्न करा. १०-१५ सेकंदांसाठी ही बोटे खेचा. त्यानंतर, ही बोटे हळुवारपणे चोळण्याचा प्रयत्न करा.

पायाची बोटे घोट्याकडे खेचा

हा व्यायाम प्रकार टाचदुखीसाठी आणि बोटांसाठी खास करून फायदेशीर आहे. हा व्यायाम करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. हा व्यायाम करताना पायाचा अंगठा घोट्याच्या दिशेने ९० अंशाच्या कोनामध्ये फिरवता येतो. मात्र, यासाठी तुम्हाला अनेक दिवस सराव करावा लागेल. त्यामुळे, हळूहळू याचा सराव करा.

कसे करायचे?

हा व्यायाम करताना सर्वात आधी खुर्चीवर बसा. तुमच्या ज्या पायाच्या बोटांना वेदना होत आहेत. तो पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर, एका हाताने तुमच्या पायाची वेदना होत असलेल्या पायाची टाच पकडा.

आता तुमच्या पायाच्या खालच्या भागाता ताण येईपर्यंत दुसऱ्या हाताने पायाचा अंगठा घोट्याच्या दिशेने खेचून घ्या. हा ताण एकावेळी किमान १५-२० सेकंद राखता आला पाहिजे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर हळूहळू हा व्यायाम करा. झटकन करायला जाऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malad Assembly Constituency: विरोधकांच्या आधी शेलारांना पक्षातूनच विरोध! उमेदवारी विरोधात पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Latest Maharashtra News Updates : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू

'केंद्रातलं राजकारण गल्लीत आणलं, ही कुठली लोकशाही? हुकूमशाहीविरुद्ध लढायला तयार राहा'; आमदार शिंदेंचं महेश शिंदेंना चॅलेंज

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पक्ष-उमेदवारांची अदलाबदल आघाड्यांची राजकीय अपरिहार्यता!

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT