आरोग्य

Yoga For Back-Neck Pain : मान आणि पाठीच्या वेदनांनी त्रस्त आहात? मग ‘या’ २ योगासनांची घ्या मदत

पाठदुखी आणि मानेच्या वेदना थांबवण्यासाठी योगा फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. झोप पुरेशी नसेल तर मग आरोग्याचे चक्र बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे, आहार, व्यायाम आणि झोप या ३ गोष्टी आपल्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत.

आपण झोपेतून उठल्यानंतर कधीकधी अचानक मान आखडते, पाठ दुखते. मानेमध्ये प्रचंड वेदना होतात. मान आणि पाठदुखीमुळे आपले कामात लक्ष लागत नाही.

जर तुम्हाला वारंवार मान आणि पाठदुखीचा त्रास जाणवत असेल आणि यावर वेळीच उपाय केले नाहीत, तर याला गंभीर स्वरूप प्राप्त होऊ शकतं. परंतु, या संदर्भात योगा आपली मदत करू शकतो.

योगासनांमुळे आपले शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते. यासोबतच मन आणि शरीर शांत होते. पाठुदखी आणि मानेच्या वेदना थांबवण्यासाठी योगा फायदेशीर आहे. चला तर मग कोणती आहेत ही योगासने ? जाणून घेऊयात.

बालासन

सर्वात आरामदायी आणि सोपे योगासन म्हणून बालासनाचा उल्लेख केला जातो. हे योगासन पाठदुखीसाठी आणि मानेच्या वेदना थांबवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • तुम्ही सर्वात प्रथम वज्रासनात बसा.

  • आता दोन्ही हात सरळ रेषेत पुढे न्या आणि जेवढे शक्य असेल तेवढे डोके खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये ताठ राहण्याचा प्रयत्न करा आणि हात सरळ ठेवा.

  • आता तुम्हाला ताण जाणवेल.

  • या स्थितीमध्ये २०-३० सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा.

  • नंतर, हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या.

  • रोज नियमितपणे या योगासनाचा सराव केल्यास पाठ आणि मानेच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

ताडासन

ताडासन हे योगासन उंची वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन केल्यामुळे, मान आणि पाठीला चांगला ताण बसतो. नियमितपणे याचा सराव केल्यास पाठ आणि मानेच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होईल.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी सरळ रेषेत उभे रहा.

  • त्यानंतर, दोन्ही पायांच्या टाचा उचलण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हात सरळ रेषेत वर उचला.

  • दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा आणि सरळ ताठ रेषेत उभे रहा.

  • या योगासनामुळे तुमच्या पाठीला, मानेला आणि कमरेला ताण बसेल.

  • चांगल्या परिणामांसाठी हे योगासन नियमितपणे करा आणि पाठ-मानदुखीपासून आराम मिळवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT