Yoga Tips esakal
आरोग्य

Yoga Tips : ‘या’ योगासनांचा सराव प्रत्येक गृहिणीने करायलाच हवा, तंदूरूस्तीसाठी आहे फायदेशीर

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योग्य फिटनेस राखण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच, योगा, वर्कआऊट्सचे विविध प्रकार करू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योग्य फिटनेस राखण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच, योगा, वर्कआऊट्सचे विविध प्रकार करू शकता. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी नियमितपणे योगा करायला हवा.

कारण, योगा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र, अनेकदा घरातील महिलांना त्यांच्या दैनंदिन कामांमुळे स्वत:साठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे, महिलांना लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी आणि थायरॉईड इत्यादी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

या परिस्थितीमध्ये महिलांनी नियमितपणे योगा (yoga) केल्यास त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. महिलांच्या शारिरीक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी योगा महत्वाचा आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी महिलांनी काही योगासनांची मदत घ्यायला हवी.

या योगासनांचा सराव केल्यास तुम्हाला भेडसावणाऱ्या शारिरीक आणि मानसिक समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल, यात काही शंका नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. जे महिलांच्या फिटनेससाठी फायदेशीर असून यामुळे महिलांना तंदूरूस्त राहण्यास मदत होईल. (yoga tips)

बालासन

हे योगासन नियमितपणे केल्याने आपले शरीर लवचिक राहण्यास मदत होते. तसेच, मानसिक आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे, ताण-तणाव कमी होतो आणि शरीरात उत्साह येतो. हे बालासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर वज्रासन स्थितीमध्ये जमिनीवर बसा. त्यानंतर, श्वास घेताना दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने न्या आणि सरळ रेषेत ठेवा.

त्यानंतर, श्वास सोडा आणि पुढे वाका. त्यानंतर, तुमच्या हाताचे तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर, काही सेकंदांनी श्वास सोडा. आता तुमच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडून दोन्ही तळहातांमध्ये डोके हलक्या हाताने ठेवा. त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये परत या. (balasan)

मलासन

महिलांसाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा सराव केल्याने तुमचे पाय, कंबर, पाठ आणि मांड्यांच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळतो. मलासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. त्यानंतर, तुमचे गुडघे वाकवून नमस्कार स्थितीमध्ये बसा. या दरम्यान, तुमच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा. (Malasan)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT