Yoga For Hair Growth : सुंदर आणि आकर्षक लूकसाठी केवळ तुम्ही चेहऱ्यावर मेहनत घ्यावी, असे नाही तर तुम्ही केसांची देखील तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. मुले असो वा मुली आजकाल सगळ्यांनाच डोक्यावर घनदाट केस हवे असतात. केसांमुळे व्यक्तीमत्वाला एक आकर्षक आणि सुंदर लूक प्राप्त होतो.
परंतु, आजकाल बिघडलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव, प्रदूषण, धूळ इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या सगळ्याचा केसांवर ही विपरीत परिणाम होत आहे. केस गळणे, केसांमध्ये फाटे फुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस पांढरे होणे इत्यादी समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
अशा परिस्थितीमध्ये मग, केमिकल्सनेयुक्त असलेल्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. काही योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
कोरड्या आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी त्रिकोणासन अतिशय फायदेशीर आहे. केसांची वाढीसाठी देखील तुम्ही या आसनाचा नियमित सराव करू शकता. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवून सरळ रेषेत उभे राहा.
आता तुमचे हात आणि खांदे सरळ रेषेत ठेवून वर करा. आता उजव्या हाताने पायाला स्पर्श करा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता दुसऱ्या पायाने हीच प्रक्रिया पुन्हा करा. (Trikonasana)
भूजंगासन हे योगासन आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी आणि केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे.
केस जास्त गळत असतील आणि पांढरे होत असतील तर, नियमितपणे भूजंगासनाचा सराव करणे फायदेशीर आहे. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपावे. त्यानंतर, दोन्ही पाय एकत्र ठेवा आणि दोन्ही हातांचे तळवे छातीजवळ ठेवावे.
जे खांद्यांना समांतर असावेत. आता तुमचे कपाळ जमिनीवर टेकवा. त्यानंतर, दीर्घश्वास घेऊन शरीराचा पुढचा भाग वर करा आणि हात सरळ रेषेत ठेवून काही सेकंद या आसनात राहा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात जास्त ताण जाणवेल. (Bhujangasana)
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.