Yoga For Healthy Skin esakal
आरोग्य

Yoga For Healthy Skin : हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Yoga For Healthy Skin : खराब जीवनशैली आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची चमक कमी होते आणि त्वचेच्या इतर समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Healthy Skin : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. खराब जीवनशैली आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची चमक कमी होते आणि त्वचेच्या इतर समस्या निर्माण होतात. अनेकदा तर वयाच्या आधीच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.

खरे तर निरोगी त्वचेसाठी उत्तम आहार आणि योगा आवश्यक आहे. वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा आणि खराब जीवनशैलीचा त्वचेवर परिणाम होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. परंतु, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी योगाची मदत घेऊ शकता.

योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने त्वचा निरोगी राहते आणि त्वचा ग्लोईंग दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी फायदेशीर असणाऱ्या काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

वृक्षासन

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर, तुमचा उजवा पाय वाकवा आणि तो नंतर तुमच्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.

त्यानंतर, दीर्घश्वास घेत तुमचे दोन्ही हात वरच्या दिशेने नेऊन नमस्काराच्या मुद्रेत ठेवा. त्यानंतर, १० ते १५ सेकंद या स्थितीमध्ये राहा. तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, श्वास सोडत दोन्ही हात खाली करा. आता दुसऱ्या पायाच्या मदतीने हे योगासन पुन्हा करा.

वृक्षासनाचा दररोज सराव केल्याने पाठदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळतो. शिवाय, त्वचा ग्लोईंग राहण्यास मदत होते.

हलासन

या योगासनाचा नियमितपणे सराव करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने नेऊन ते डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा.

आता अंगठ्याच्या मदतीने जमिनीला स्पर्श करून तुमचे दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. या स्थितीमध्ये तुमची कंबर जमिनीला समांतर रहायला हवी. आता श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये परत या.

हलासन हे योगासन करायला जरा कठीण आहे. त्यामुळे, जर तुम्ही पहिल्यांदाच हे योगासन करत असाल तर योगातज्ज्ञाची मदत जरूर घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT