Yoga For Knee Pain esakal
आरोग्य

Yoga For Knee Pain : गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ योगासनांची होईल मदत, नियमित करा सराव

आपले जसे वय वाढते, तशा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा ही समावेश आहे. केवळ वृद्ध लोकांनाच नाही तर आजकाल तरूणांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Knee Pain : आपले जसे वय वाढते, तशा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा ही समावेश आहे. केवळ वृद्ध लोकांनाच नाही तर आजकाल तरूणांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

सांध्यांमध्ये आणि गुडघ्यामध्ये वेदना होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शारिरीक हालचाल न होणे. या शिवाय, जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे, फास्टफूडचे अधिक सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे गुडघेदुखी सारख्या समस्या भेडसावतात.

या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी स्नायूंना बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि पायांना मजबूत करण्यासाठी तुम्ही नियमित काही योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

त्रिकोणासन

त्रिकोणासनाचा नियमित सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनाच्या सरावाने स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखीपासून आराम मिळवता येतो. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी सरळ रेषेत उभे रहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये दोन फूट अंतर ठेवा.

आता एक दीर्घ श्वास घेऊन तुमचे शरीर उजव्या बाजूला वाकवा. त्यानंतर तुमचा डावा हात वरच्या दिशेने न्या. आता तुमचे डोळे डाव्या हातांच्या बोटांवर स्थिर ठेवा. काही वेळ या स्थितीमध्ये ताठ रहा. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

मलासन

ताण-तणाव कमी करण्यासाठी, गुडघेदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. हे मलासन नियमित केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. हे योगासन करण्यासाठी सरळ रेषेत उभे रहा.

तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा आणि दोन्ही हात एकमेकांना जोडून नमस्कार मुद्रा करा. त्यानंतर, हळूहळू खाली बसा आणि श्वास सोडत पुढे वाका. या स्थितीमध्ये तुमच्या शरिराला ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये ताठ रहा त्यानंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT