World Bicycle Day News | Advantages of Cycling सकाळ
आरोग्य

World Bicycle Day: सायकल चालवण्याने हृदयरोगाचा धोका होतो कमी

सायकल दिनी सोशल मीडियावर राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू तसेच अन्य सामान्य लोक सायकलवर फोटो शेअर करत आहे

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला आज सोशल मिडियावर अचानक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू तसेच अन्य सामान्य लोक या सगळयांचे सायकलवर फोटो दिसत असतील तर साहजिकच तुमच्या मनात प्रश्न पडला असेल काय आहे आज? तर आज आहे जागतिक सायकल दिवस आणि याच सायकल दिवसामागील इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. (World Bicycle Day)

सायकल दिवसाचा इतिहास

सर्वप्रथम सायकल दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर असणारे लेझेक सिबिल्स्की यांनी 1990 मध्ये दिला होता. या प्रस्तावानं पुढच्या काही काळासाठी सायकल चालवण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहन दिले पण कालांतराने याचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले आणि सायकल पुन्हा मागे पडायला लागली. कितीतरी वर्षांनंतर युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने या दिनाचे महत्त्व जपण्यासाठी 2018मध्ये 3 जुन जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला तेव्हापासून हा दिवस जगभरात "सायकल दिवस' म्हणून साजरा केला जातो. (today is world bicycle day know is advantages)

दररोज सायकल चालवण्याचे फायदे

1. दररोज 30 मिनिटे सायकल चालवल्याने रात्री चांगली झोप लागते.

2. दररोज सायकल चालवल्यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो असं एका संशोधनानुसार समोर आलं आहे.

3. एखादा व्यक्ती दररोज ३० मिनिटे सायकल चालवत असल्यास त्याचा मेंदू सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक सक्रिय राहतो

4. सायकलिंग केल्याने रोगप्रतिकारक उत्तम राहते. आणि सतत आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

5. सायकलिंग शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते. नियमित सायकलिंग करुन तुम्ही तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी सहज बर्न करूं शकता.

6. नियमित सायकलिंग केल्याने हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या आजारांमुळे होणारा मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते.

7. जर का आपल्या जवळपासच्या अंतरावर जायचे असल्यास आपण सायकलचा वापर करावा, असं तज्ञ सांगतात.

8. यामुळे दररोज शेकडो लिटर पेट्रोलची बचत तर होईल त्याचबरोबर शहरातील प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, पायी चालण्यापेक्षा सायकल चालवणे अधिक फायदेशीर असल्याचे दिसून आले. यात असाही निष्कर्ष पुढे आलाय की, सायकल चालवल्याने कॅन्सरचा धोका 45 टक्क्यांनी आणि हृदयरोगाचा धोका 46 टक्क्यांनी कमी होतो.

जर तुम्ही पायी चालत असाल तर हे प्रमाण कमी होते म्हणजे पायी चालल्याने हृदय रोगाचा धोका फक्त 27 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर नियमितपणे सायकलिंग करा आणि निरोगी राहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT