नेरुळ, बातमीदार
हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामात फ्लू किंवा इतर संसर्ग झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. अशातच हिवाळ्यात फळांचे सेवन खूप कमी करतात. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती प्रभावित होते. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात फळांचा समावेश करून घेणे, गरजेचे आहे. तसेच हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने कमी प्रमाणात पाणी पितात. त्यामुळे आहारात फळांचा समावेश केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असल्याने थंडीचा हंगाम हा फळांसाठी देखील उत्तम असतो.
सफरचंद
सफरचंदाचा हंगाम हिवाळ्यात असतो. दररोज सफरचंद खाल्ल्याने आजारांपासून दूर राहता येते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सफरचंदांमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे ‘सी’ आणि ‘के’असतात. त्यामुळे जळजळ होण्याची समस्या कमी होते.
डाळिंब
थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. दररोज एक डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब रक्त पातळ करते, ज्यामुळे रक्तदाब, हृदय, वजन कमी आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
पेरू
पेरूचा हंगाम हिवाळ्यात येतो. थंडीमुळे अनेकजण पेरू खात नसले तरी. पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. दिवसा उन्हात पेरू खाऊ शकता.
संत्र
संत्र हे बाजारात आपल्याला दोन ऋतूमध्ये दिसतात. पण हिवाळ्यात येणारी संत्री ही खास करून गोड असतात. संत्रीमध्ये व्हिटामीन ‘सी’ आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा त्याचा समतोल राखण्यासाठी संत्र्याची खूप मदत होते.
स्ट्रॉबेरी
हिवाळ्यात हमखास खाल्ले जाणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते, त्वचा अधिक सुंदर म्हणजे तरूण दिसण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तसेच यामध्ये देखील व्हिटामीन ‘सी’ आणि ‘बी’ सर्वाधिक असते. शरीरातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो. अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण या फळात अधिक असून हृदयासाठी खूप फायदा होतो.
सीताफळ
हिवाळ्यातील सीताफळ महत्त्वाचे फळ आहे. अनेकांना यामध्ये खूप बिया असल्यामुळे खायला कंटाळा करतात. सीताफळ हे लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे फळ आहे. वजन वाढण्याकरता हे फळ खाल्ले जाते. तसेच लहान मुलांची पचनशक्ती थोडी नाजूक असते अशावेळी सीताफळ खाल्याने पचनशक्ती व्यवस्थित राहते. यामध्ये व्हिटामीन ‘बी’ ६ चे प्रमाण सर्वाधिक असते.
अंजीर
अंजीरचा वापर सुक्यामेव्यात केला जातो. मात्र, हिवाळ्यात अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. सुक्यामेव्यातील अंजीर आपण वर्षभर खावू शकतो. पण ताजे अंजीर अत्यंत फायदेशीर आहे. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते.
अननस
ज्या व्यक्तींना संत्र आवडत नाही, त्यांच्याकरता अननस हा उत्तम पर्याय आहे. अननस आणि संत्र्याचे फायदे जवळपास सारखेच आहेत. अननसातही व्हिटामीन सीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या फळात दाहकपदार्थाला विरोध करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी झाल्यास त्याने अननसाचं सेवन करावं. हिवाळ्यात शरीराला आवश्यक बदल अननस हे फळ सांभाळून घेते.
चिकू
डोळ्यांची उत्तम निगा राखण्यासाठी आहारात व्हिटामीन ‘ए’ अत्यंत महत्त्वाचे आहे. तात्काळ भूक शमवण्याचे काम चिकू करू शकते. चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते, यामुळे प्रवासात अगदी सहजपणे कॅरी करू शकतो. गरोदर महिलेकरता चिकू सर्वात फायदेशीर आहे.
मोसंबी
हिवाळ्यात व्हिटामीन ‘सी’ करता आणखी एक पर्याय म्हणजे मोसंबी. संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात गोड मोसंबी असते. तसेच मोसंबीत शरीरासाठी महत्त्वाचे असलेले फायबर सर्वाधिक असते. मोसंबीने श्वसनाचा त्रास कमी होते. तसेच सूज कमी करण्यासाठी देखील गुणकरी आहे. संधीवाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने मोसंबी खावी.
स्टारफ्रूट
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलीत राखण्यासाठी स्टारफ्रूट या फळाची खूप मदत होते. या फळामुळे शरीरात चरबीची पेशी तयार होण्यास प्रतिबंध निर्माण होते. या फळाची चव आंबट-गोड असल्यामुळे सलाडमध्ये याचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे त्याचा आकार लहान मुलांना अधिक आकर्षित करतो.
पपई
हिवाळ्यातील आदर्श फळ म्हणजे पपई. थंड वातावरणात शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो. थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावा. तसेच महिलांची मासिक पाळी दर महिन्याला वेळेत आणि सुरळीत येण्यासाठी पपई महत्त्वाचा आहे. पपईमुळे त्वचा तजेलदार राहण्यास खूप मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.