health sakal
आरोग्य

किपफिट : फायदे सातत्यपूर्ण व्यायामातील

व्यायामाला सुरुवात करतो, तेव्हा मेंदू स्नायूंशी एक प्रकारे संवाद साधत असतो. तो एक नवा मार्ग तयार करत असतो.

सकाळ वृत्तसेवा

विकास सिंह,

संस्थापक, फिटपेज ॲप

आपण सर्व जण आपापल्या पद्धतीने व्यायाम करत असतो, तरीदेखील काही जणांनाच त्यांचे ध्येय गाठता येते किंवा अपेक्षित परिणाम दिसून येते, काहींच्या बाबतीत असे होत नाही. असे का होत असेल, याचा तुम्ही विचार केला आहे का? याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे सातत्य!

व्यायामात सातत्य असल्यास तुमच्या

शरीरालाही त्याची सवय होते आणि

परिणाम दिसून येतो. अधिक अभ्यास

केल्यास या तत्त्वामागील विज्ञानही समजून

घेता येईल.

मेंदू आणि स्नायूंचा संवाद

व्यायामाला सुरुवात करतो, तेव्हा मेंदू स्नायूंशी एक प्रकारे संवाद साधत असतो. तो एक नवा मार्ग तयार करत असतो. व्यायामात सातत्य असल्यास मेंदूचे काम सोपे होते आणि शरीरालाही त्याची सवय होते. मात्र, व्यायामात सातत्य नसल्यास अडथळे निर्माण होऊन काहीच साध्य होत नाही.

१० हजार तासांचा नियम

कौशल्य संपादनांबाबत १० हजार तासांचा नियम महत्त्वाचा समजला जातो. तो व्यायामाच्या बाबतीतही लागू होतो. सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे स्नायूंची स्मरणशक्ती विकसित होऊन व्यायाम करताना फायदा होतो. व्यायामातील सातत्यामुळे त्या-त्या वेळी होत असलेल्या विशिष्ट हालचाली स्नायूंच्या सवयीच्या होतात. व्यायाम सुरू करताच स्नायू प्रतिसाद देतात.

वाढीसाठी ताण हवा

स्नायूंच्या वाढीसाठी त्यांना ताण देणे, व्यायाम करणे म्हणजे थोडक्यात आव्हान देणे आवश्‍यक असते. यात सातत्य असेल, तर स्नायू तो ताण सहन करतात आणि अधिक सक्षम होतात. त्यात सातत्य नसल्यास स्नायूंच्या हालचाली स्तब्ध होतात. त्याचा शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतो.

सातत्य आणि सुधारणा व्यायामात सातत्य आणि मेहनतीनंतरची विश्रांती या दोन्ही गोष्टी खूप आवश्‍यक असतात. यामुळे स्नायूंमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येते. व्यायाम आणि विश्रांती या दोन्ही गोष्टी एकापाठोपाठ एक ठरावीक अंतराने होत राहिल्या, तर ती प्रक्रिया सवयीची होते. त्यामुळे स्नायूंची वाढ होण्यास मदत होते.

सवयींचा परिणाम शरीरासाठी व्यायाम करणे सवयीचे झाले पाहिजे. सायकल शिकताना सुरुवातीला पायडल मारताना काळजी घेतली जाते. कालांतराने त्या सर्व गोष्टी सवयीच्या होतात. व्यायामाचेही असेच आहे. नियमितता असेल, तर शरीर ‘ऑटो’ मोडवर जाते आणि व्यायाम आपोआप होतो.

पोषणतत्त्वांमधील सातत्य व्यायामाप्रमाणेच ‘डाएट’मध्ये आपण कोणती पोषणतत्त्वे शरीराला देतो, हे पाहणे व त्यात सातत्य राखणे महत्त्वाचे असते. तुम्ही शरीराला इंधन म्हणून कोणती पोषणतत्त्वे देतात आणि त्यात किती सातत्य ठेवता यावर त्याचे कार्य अवलंबून असते. ‘डोपामाइन’ची भूमिका व्यायामात सातत्य ठेवल्यास शरीरात डोपामाइन निर्माण होते. ते एक ‘न्यूरोट्रान्समीटर’ आहे. त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहता.

मेंदूला नवी चेतना आणि प्रेरणा मिळते व तो कार्य करण्यास उद्युक्त होतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला चालना मिळते. व्यायामाच्या बाबतीत सातत्य हा केवळ एक शब्द किंवा दाखवण्याची गोष्ट नाही, तर ती प्रत्यक्ष कृती करण्याची गोष्ट आहे. व्यायामाचे प्रकार ते डाएट या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही सातत्य ठेवले, तर निश्‍चितच अपेक्षित परिणाम दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT