Flat feet sakal
आरोग्य

हेल्थ वेल्थ : सपाट पाय- कारणे व उपाय

सकाळ वृत्तसेवा

काही लहान मुलांचे पाय सपाट असतात. त्यांच्या पायाच्या मध्यभागी खोबणी नसते, परंतु ही कमान वयानुसार दिसते.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

काही लहान मुलांचे पाय सपाट असतात. त्यांच्या पायाच्या मध्यभागी खोबणी नसते, परंतु ही कमान वयानुसार दिसते. या कमानीद्वारे, उभे राहणे आणि शरीराचे वजन संतुलित करणे, चालणे, धावणे आणि कोणत्याही दिशेने वेगाने जाणे सोपे होते. पायाची कमान स्थिरता आणते. या लोकांना चालणे, धावणे किंवा त्यांचे वजन संतुलित करणे यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते का? चला बघूया.

सपाट पायाचे दोन प्रकार

  • तुम्ही तुमचा पाय जमिनीवर ठेवता, तेव्हा ही कमान दिसत नाही आणि पाय हवेत असताना ती दिसते.

  • जेथे पाय नेहमी सपाटच दिसतो.

सपाट पाय कसा विकसित होतो?

चालणे किंवा धावणे यांसारख्या गोष्टी करण्यासाठी तुमचा पाय खूप दबाव शोषून घेतो. ह्याच्या जटिल रचनेत १९ स्नायू, २८ हाडे, ३३ सांधे आणि १०७ लीगामेंट्स समाविष्ट आहेत. ही रचना तुमच्या एकूण हालचालीला बळ देण्यासाठी एकत्र काम करते.

प्रत्येक वेळी चालता किंवा धावताना तुमचा पाय एका विशिष्ट पद्धतीने जमिनीवर येतो. काही लोक त्यांच्या शरीराच्या वजनाचा भार पायाच्या चवड्यावर ठेवतात, तर काही लोक तळव्याच्या आतील भागाचा अधिक उपयोग करतात. ह्या प्रकारचे फूट-लँडिंग प्रोनेशन, सुपिनेशन आणि ओव्हरप्रोनेशन म्हणून ओळखले जाऊ शकते.

सुपिनेशन म्हणजे जेव्हा प्रत्येक पाऊल ठेवताना तुमचे वजन पायाच्या बाहेरील बाजूवर जास्त येते.

  • पाय आतल्या बाजूने वळतो तेव्हा तुमचे वजन तुमच्या पायाच्या आतील भागावर येते.

  • पाय खूप आतील बाजूस वळतो तेव्हा ओव्हरप्रोनेशन होते, ज्यामुळे तुमचा घोटा जवळजवळ जमिनीवर येतो.

  • ओव्हरप्रोनेशन दरम्यान पायाची-कमान सपाट होते, याला सपाट पाय असेही म्हणतात.

पाय सपाट असण्याचा अर्थ हानिकारक स्थिती असणे असा होत नाही. अधिक कमान असणाऱ्या पायाच्या तुलनेत हे जास्त लवचिकता देऊन धक्के शोषून घेण्यास मदत करतात, परंतु हे तुमचा कठोर सपाट पाय आहे की लवचिक सपाट पाय आहे यावर ठरते.

लवचिक : ही एक सामान्य स्थिती आहे, ज्यामध्ये आपण आपला पाय हवेत वर उचलता पायातील कमान पूर्णपणे निरोगी आणि नेहेमीसारखी दिसते. मात्र, तुम्ही उभे राहता आणि पायावर काही वजन येते, तेव्हा ती सपाट होऊन दिसेनाशी होते.

कठोर : तुमचे वजन अधिक असो वा नसो, ह्या परिस्थितीमध्ये तुमचे पाय नेहमी सपाट/अतिजास्त आतल्या बाजूस गेलेले असतात. तुम्ही या श्रेणीत येत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे, कारण यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापती होऊ शकतात. हे तुमच्या दुसऱ्या या पायाच्या चवड्याला खूप जास्त ताण देऊ शकतात आणि तुमच्या शरीरातील वजन वितरणात व्यत्यय आणून विविध भागात सूज येऊ शकते.

इनसोल्स सपाट पायासाठी मदत करतात का?

साधारणपणे, सपाट पाय असलेल्या लोकांना इनसोल वापरण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, इनसोल घातल्याने तुमचे स्नायू आणि टेंडन्सच्या हालचालींवर मर्यादा येतात, ज्यामुळे ते पुढे जाऊन कमकुवत होण्याची शक्यता असते. तुम्हाला इनसोल मऊ आणि आरामदायी वाटेल आणि तुम्हाला वाटेल, की ते तुमच्या हालचालीत मदत करत आहे. मात्र, अशा आरामामुळे तुमच्या पायावर अधिक भार येतो. असा कोणताही अभ्यास नाही ज्याने हे सिद्ध केले की इनसोल्स हा घटक सपाट पायांवर उपचार करण्यास मदत करतो.

पाय सपाट असल्यास काय?

  • पायाचे स्नायू आणि टेंडन्स मजबूत करण्यावर भार द्या.

  • सुरुवातीला, तुम्ही तुमचे पाय टॉवेलवर

  • ठेवून जसे तुम्ही तुमचे हात वापरून टॉवेल पकडता तसे पकडण्याचा प्रयत्न करू शकता

  • तुमच्या सर्व पायाची बोटे वापरून टॉवेल आत दुमडून घ्यायचा प्रयत्न करा. हे दररोज किमान १० वेळा करा.

  • बॅलन्स साधण्यावर लक्ष द्या. तुम्ही तुमच्या डाव्या पायावर २० सेकंद उभे राहू शकता. मग तुमच्या उजव्या पायावर २० सेकंद थांबा. हे दिवसातून ३ वेळा करा.

  • तुमच्या पायाचे स्नायू बळकट करा,

  • गुडघा आणि नितंबाच्या सांध्याभोवतीची हालचाल वाढवा. गवतावर अनवाणी चालायला जा.

  • पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, ग्लुकोसामाइन, ‘बी१२’ इत्यादी शरीरात जाईल हे डोक्यात ठेऊन त्यानुसार आपला आहार सुधारा.

  • धावायचे चांगले शूज घ्या. टाचांना व्यवस्थित कुशन सपोर्ट आणि हिल टू हिल असलेला ड्रॉप तुम्हाला फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Manoj Jarange: “आता तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Latest Maharashtra News Updates : राज्याचा स्वाभिमान आणि धर्म बुडवणार हे सरकार - वडेट्टीवार

Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंडची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात; असा असेल इलेक्शन कार्यक्रम

Election Commission Press Conference LIVE : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT