- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप
वजन कमी करण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत, चालणे हा सोपा व्यायाम आहे. जेवणानंतर चालण्याचे काही फायदे असतीलच. ते काय आहेत? आपण आता पाहूया.
रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेहाचा धोका कमी करणे, हृदयरोगाचा धोका कमी करणे आदी. अन्न हेच आपल्याला जिवंत ठेवते आणि ऊर्जा देते. जेवल्यानंतर आपले शरीर ३०-६० मिनिटांत अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास सुरवात करते. ग्लुकोज ही मूलत: साखर आहे आणि आपण नुकतेच जेवण केले असल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. जेवणानंतर फेरफटका मारणे किंवा फिरणे म्हणजे ते चालणे पूर्ण करण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते. याचा अर्थ चालणे शरीरात असलेले ग्लुकोज वापरते, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
पचन सुधारते
मानवी पचनसंस्था खूप गुंतागुंतीची आहे. अन्नाचे आपल्या तोंडात छोटे छोटे तुकडे होतात, जे आपल्या घशातून आपल्या पोटात जाते आणि नंतर आपल्या आतड्यांमध्ये जाते. जेवणानंतर फक्त चालण्याने पचनसंस्था सुधारली आणि जलद होऊ शकते. जेवणानंतर कमी तीव्रतेचे चालणे तुमच्या पोटाच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि मूलत: पोटाला जलद गतीने काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. अन्न अधिक वेगाने खाली जाण्यास मदत करते. याचा अर्थ, रात्रीच्या जेवणानंतर चालणे तुम्हाला झोपायला जाताना तुमचे पोट कमी फुगलेले आणि भरलेले वाटण्यास हातभार लावते.
वजन राखण्यास मदत
एखादी व्यक्ती जेवण करते तेव्हा शरीर ऊर्जेची पातळी पुन्हा भरून काढण्यासाठी जेवणाचा वापर करते. परंतु त्याच वेळी, शरीर अतिरिक्त अन्न फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवते जेणेकरून भविष्यात गरज भासल्यास कधी ऊर्जेची कमी भासू नये. जेवणानंतर चालता, तेव्हा शतपावलीच्या कृतीला चालना देण्यासाठी जेवणाचा उपयोग ऊर्जा म्हणून केला जातो. याचा अर्थ, ग्लुकोजच्या स्वरूपात असलेली अतिरिक्त ऊर्जा नष्ट होते आणि तुमचे शरीराचे वजन राखले जाते. त्याच वेळी, चालण्याची तीव्रता वाढल्यास, एखाद्या व्यक्तीला वजन कमी करण्याची देखील संधी असते.
तुम्ही किती वेळ चालावे आणि चालण्याची तीव्रता किंवा वेग किती असावा हे दोन महत्त्वाचे घटक जेवल्यानंतर चालताना लक्षात ठेवावेत. चालण्याची तीव्रता आणि कालावधी येतो तेव्हा, जेवणानंतर ६० मिनिटे वेगवान चालणे योग्य आहे. परंतु आपल्या व्यग्र दिवसात चालण्यासाठी तासभर वेळ काढणे थोडे कठीण होते. त्यामुळे १५-३० मिनिटांच्या आरामशीर चालण्यानेही तुम्हाला काही फायदा होईल. शेवटी, अजिबात न चालण्यापेक्षा कमी तीव्रतेने लहान चालणे खूप चांगले आहे.
एकंदरीत, जेवणानंतर चालण्याचे अनेक फायदे आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण हे शेवटी जेवणा नंतर चालायला जायची सवय करून घेण्यावर येऊन थांबते. सामान्यतः आपण सर्वजण पोटभर जेवल्यानंतर आपण एकाठिकाणी बसून राहतो आणि आपल्याला चालायला जायला कंटाळा येतो वाटतो आणि आपल्याला चालायला जायची इच्छा होत नाही.
जेवणानंतरच्या चालण्याचे फायदे आपल्याला मिळतील याची खात्री करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जेवणानंतर झोपण्याची सवय सोडून देणे आणि दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी उठून चालायला जाणे. तरच, त्याचा आपल्या आरोग्यावर, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक चांगला परिणाम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.