Heart Sakal
आरोग्य

हेल्थ वेल्थ : ‘हार्ट फिटनेस’चे महत्त्व

इतर गोष्टींबरोबरच हृदयाची रक्त पंप करण्याची परिणामकारकता आणि क्षमता आपल्या हृदयाची तंदुरुस्ती ठरवतात. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे रक्त हृदय ढकलते.

सकाळ वृत्तसेवा

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

इतर गोष्टींबरोबरच हृदयाची रक्त पंप करण्याची परिणामकारकता आणि क्षमता आपल्या हृदयाची तंदुरुस्ती ठरवतात. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे रक्त हृदय ढकलते. रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता जाणून घेतल्याने, संपूर्ण शरीराला योग्यरीत्या कार्यरत राहण्यासाठी आवश्यक प्रमाणात पोषण आणि ऊर्जा मिळत आहे की नाही हे आपण समजू शकतो. आपण हृदयाच्या तंदुरुस्ती स्पष्ट करतो, तेव्हा शरीरातील सर्व अवयवांच्या कार्य सांगत असतो.

बैठी जीवनशैली हृदयाची कार्यक्षम कमी करते. परिणामी आरोग्याची एकूण गुणवत्ता कमी होते. आपले ह्रदय हे क्रियाशीलतेने फिट राहते, परंतु शरीराची हालचाल कमी होते तेव्हा हृदयाचे काही भाग कडक होण्यास सुरुवात होते. शरीरात अपर्याप्त प्रमाणात रक्त हृदय पंप करू लागते, ज्यामुळे स्नायू ऑक्सिजनपासून वंचित राहिल्याने थकवा येतो. खराब रक्तप्रवाहामुळे हृदयावरील दाब वाढतो. त्यामुळे हृदयाच्या चेंबरपैकी एक डावा वेंट्रिक्युलर कडक होतो. डाव्या वेंट्रिकुलरच्या या कडकपणामुळे, हृदयाचा पंपिंग रेट वाढतो, ज्यामुळे रेस्टिंग हार्ट रेट (RHR) वाढतो. याचा अर्थ असा होतो की तुम्ही निष्क्रिय असता तेव्हा देखील तुमचे हृदय तुमच्या शरीराला गरजेचा रक्तपुरवठा करण्यास धडपडत असते.

हृदयामधून जाणाऱ्या रक्तवाहिन्या, ज्यात लवचिकता आणि पल्स बरोबर जुळवून घेण्याची प्रवृत्ती असते, त्याही कठीण होतात आणि पुरेशा प्रमाणात प्रसरण पावत नाहीत. पल्सच्या प्रतिक्रियेत रक्तवाहिन्यांचा विस्तार होणे अत्यावश्यक आहे, कारण यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित होतो. हा डोमिनो-इफेक्ट हार्ट फेल्युअरचा धोका वाढवू शकतो.

बायसेप मसल्स विरुद्ध हृदय मसल्स

हृदय देखील स्नायूंवर कार्य करते, ज्याला कार्डियाक स्नायू म्हणतात. ह्रदयाचे स्नायू फक्त हृदयात आढळतात आणि त्यांची प्राथमिक भूमिका संपूर्ण शरीराला रक्त आणि ऑक्सिजन पुरवणे ही असते. हृदय पिळणे आणि रक्त पंप करणे हे या स्नायूंद्वारे केले जाते. परंतु हे स्नायू स्वतःच कार्य करतात आणि थेट नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत.

याउलट बायसेप्स, ट्रायसेप्स, छातीजवळ आढळून येणारे मसल्स कंडराद्वारे हाडांशी जोडलेले असतात. या स्नायूंना कंकाल स्नायू म्हणतात. त्याद्वारे हात किंवा पायांची हालचाल होते. हृदयाच्या स्नायूंच्या तुलनेत, हे स्नायू तुमच्या इच्छेनुसार नियंत्रित केले जातात. तुम्ही चालता, धावता, पोहता, सायकल चालवता किंवा कोणताही कार्डिओ व्यायाम करता तेव्हा तुमचे हृदय जोराने रक्त पंप करते आणि काम करणाऱ्या स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पुरवण्यासाठी जलद गतीने धडधडते. हृदय अधिक काम करत असते, तसतसे ह्रदयाचे स्नायू ताण सहन करतात, आणि हे स्नायू योग्य पोषण आणि पुनर्प्राप्तीने अधिक मजबूत होतात.

तुम्ही जिममध्ये वजन उचलण्यासाठी बायसेप्स आणि हाताचे स्नायू वापरता. धावताना किंवा चालताना शरीरातील जवळजवळ सर्व स्नायूंना कार्यरत व्हावे लागते. कार्डिओ केवळ तुमच्या हृदयाच्या स्नायूंना कठोर परिश्रम करून बळकट बनवत नाही, तर ते तुमच्या संपूर्ण शरीरातील हाडे, कंडरा आणि स्नायूंना कामाला लावतात, ज्यामुळे ते मजबूत होतात. चालणे किंवा धावणे यासारखे साधे व्यायामही एकंदर फिटनेस सुधारण्याचा शक्तिशाली मार्ग असू शकतो. तुम्हाला यासाठी जिम मेंबरशिपची आवश्यकता नाही. आठवड्यातून फक्त १५० मिनिटे चालणे किंवा धावणे देखील पुरेसे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT