Fitness Goal Sakal
आरोग्य

हेल्थ वेल्थ : तुमचे फिटनेसचे ध्येय ठरवा!

जगातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक जाड आहेत आणि त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जगातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक जाड आहेत आणि त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

- विकास सिंह

आपल्या पूर्वजांच्या नोकऱ्या अशा होत्या, की ते शारीरिक दृष्ट्या कायम सक्रिय राहात आणि ते बहुतेक वेळा घरात शिजवलेलेच अन्न खात. मात्र, आधुनिक जगातील नोकऱ्यांनी माणसाला अनेक तासांसाठी खुर्चीला बांधून ठेवले असून, आपण निष्क्रिय आणि गतिहीन झालो आहोत. फास्ट फूड सहज आणि स्वस्तात उपलब्ध झाल्याने लोकांनी जेवणाचे नियोजन करणेच सोडून दिले आहे. त्यांना बाहेरून काहीतरी मागवून पोट भरणे अधिक सोईस्कर वाटू लागले आहे. या जीवनशैलीमुळे सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले असून, त्यामुळे आपली तब्येत आणि फिटनेसचा दर्जा खालावला आहे.

जगातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक जाड आहेत आणि त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे खूपच धोकादायक असले, तरी तुम्हाला घाबरण्याचे काहीच नाही, कारण आपल्याकडे अत्यंत सोपे, परिणामकारक आणि सहज अंमलबजावणी करता येतील असे रोजचे व्यायाम आणि शास्त्रोक्त डाएटचे तुम्हाला मानवणारे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हा एखाद्या जीमला भेट दिल्यास तुमच्या लक्षात येईल, की बहुतांश लोक सर्वसमावेशक अशा व्यायामाच्या किंवा डाएटच्या प्लॅनचे पालन करतात. त्याचा त्यातील काहींना चांगला फायदा होतो, तर काहींना अगदीच कमी किंवा अजिबातच फायदा होत नाही. प्रत्येकाचे शरीर एकाच डाएटला किंवा व्यायामाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते, कारण प्रत्येक जण ऊर्जेचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. तुमच्या घरातील एअर कंडिशनरचे उदाहरण घ्या. जुना एसी नव्याच्या तुलनेत अधिक ऊर्जेचा वापर करतो.

शरीर ऊर्जेचा वापर कसे करते?

तुम्ही शांत आणि जागे असता, तेव्हा तुमच्या शरीरातील सर्व अवयव कामात असतात आणि त्यांचे महत्त्वाचे कार्य अखंड करीत असतात. हे सर्व कार्य करण्यासाठी तुमच्या शरीराला ऊर्जेची गरज भासते. या ऊर्जेला बेसल मेटाबोलिक रेट (बीएमआर) असे म्हणतात. तुम्ही जागे असताना तुमच्या शरीराला लागणारी ही किमान ऊर्जा आहे. तुमच्या शरीरातील एकूण ऊर्जेपैकी ४५ ते ७० टक्के ऊर्जा ‘बीएमआर’साठी वापरली जाते. एका प्रौढ पुरुषासाठी सरासरी ‘बीएमआर’ १ हजार ३०० ते १ हजार ५०० कॅलरी असते. महिलांसाठी हेच प्रमाण १ हजार ते १ हजार ३०० कॅलरी असते. तुम्हाला दिवसभरात लागणारी ही किमान ऊर्जा आहे. मात्र, तुम्ही बाहेर पडून काही काम करून लागता, तेव्हा तुम्हाला बीएमआरपेक्षा अधिक ऊर्जेची गरज भासते. तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या एकूण ऊर्जेला टोटल एनर्जी एक्स्पेंडिचर (टीईई) म्हणतात. ही ऊर्जा तुमच्या जीवनपद्धतीवर ठरते. यात तुम्ही काय खात, तुम्ही कसे झोपता, तुम्ही किती सक्रिय आहात, तुमची मानसिक स्थिती कशी आहे यांचा समावेश होतो. तुम्ही दैनंदिन कामकाजात कमी प्रमाणात सक्रिय असाल आणि खूप प्रवास करीत असल्यास अधिक किंवा खूप अधिक काम करणाऱ्याच्या तुलनेत तुमची खर्च होणारी ‘टीईई’ कमी असेल.

अतिरिक्त ऊर्जेचे काय होते?

आपले शरीर अतिरिक्त कॅलरीज किंवा ऊर्जा मिळाल्यास ती नैसर्गिकपणे साठवून ठेवते. तुम्ही गरजेपेक्षा अधिक कॅलरीजचे सेवन केल्यास शरीर त्या साठवून ठेवते. शरीर मूलतः फॅट साठवून ठेवते. तुमचे शरीर अतिरिक्त फॅट साठवायला सुरवात करते, याचा अर्थ तुम्ही अधिक कॅलरीज असलेले अन्न घेत आहात. त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या कॅलरीपेक्षा कमी कॅलरीजचे अन्न ग्रहण केल्यास त्याला कॅलरींची कमतरता असलेला आहार म्हणतात.

कमी कॅलरीज आणि पोषणमूल्ये!

तुम्ही कमी कॅलरीज घ्या अथवा अधिक, तुम्हाला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट या मायक्रोन्यूट्रियंट्सची गरज असते. हे करण्याचा एक परिणामकारक मार्ग आहे तुमच्या फिटनेसचे ध्येय निश्‍चित करणे. कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचे प्रमाण कमी करायचे आहे, की प्रोटिनचे प्रमाण वाढवायचे आहे, हे तुमचे ध्येयच तुम्हाला सांगेल. तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास तुम्ही कॅलरीजचे प्रमाण कमी असलेला डाएट घेणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी तुम्हाला डाएट आणि व्यायाम या दोन्हीची गरज पडले. दररोज व्यायाम केल्याने अतिरिक्त कॅलरीज जाळल्या जातील आणि त्यामुळे तुमचे शरीर अतिरिक्त कॅलरीज साठवून ठेवणार नाही. त्यामुळे तुमच्या फिटनेसचा प्रवास योग्य ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच करा.

(लेखक फिटपेज ॲपचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT