Healthy Tips: Sakal
आरोग्य

Healthy Tips: 'या' एका जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतेय सारखी झोप, वेळीच घ्या काळजी

पुजा बोनकिले

Healthy Tips: निरोगी आरोग्यासाठी शरीरात आवश्यक जीवनसत्वे असणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोकांना दिवसभर झोप येते. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता असू शकते. अनेक लोक बरेच व्हिटॅमिन बी 12 कडे लक्ष देत नाही. पण हे जीवनसत्व शरीरासाठी आवश्यक आहे. बी १२ वाढवण्यासाठी रोजच्या आहारात सामान्य खाद्यपदार्थांसह दुग्धजन्यपदार्थांचे सेवन करू शकता. अशावेळी अनेकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता सुरू होते. चला जाणून घेऊया व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला जास्त झोप का येते.

जीवनसत्वे बी १२ ची कमतरता असल्यास झोप का येते?

शरीरात जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेकदा झोप येते. खरं तर जीवनसत्व बी 12 आपल्या शरीरात मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते, जे एक हार्मोन आहे. हे झोपेवर नियंत्रण ठेवते, म्हणून त्याच्या कमतरतेमुळे झोप येते.

जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे जूवनसत्वे बी 12 नसते, तेव्हा लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे शरीराच्या पेशींना ऑक्सिजन मिळणे कठीण होते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते आणि व्यक्तीला थकवा जाणवू लागतो, तसेच झोपही येते. एनसीबीआयच्या अहवालानुसार शरीरात त्याच्या अत्याधिक कमतरतेमुळे व्यक्तीला खूप झोप आणि थकवा जाणवतो.

जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसतात?

शरीरात जीवनसत्वे बी 12 च्या कमतरतेमुळे पुढील लक्षणे दिसतात.

शरीरात अशक्तपणा आणि थकल्यासारखे जाणवते.

अतिसारचा त्रास होऊ शकतो.

जीभेमध्ये वेदना किंवा लालसरपणा येऊ शकतो.

गोष्टी लक्षात राहत नाही.

त्वचेवर पुरळ येतात.

हात पायांमध्ये मुंग्या येतात.

शरीरात जीवनसत्वे बी 12ची कमतरता कशी कमी कराल?

शरीरात जीवनसत्वे बी 12 ची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनसत्वे बी12 सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.

तुमच्या आहारात जीवनसत्वे बी 12 चे प्रमाण वाढवण्यासाठी जीवनसत्वे बी 12 चे चांगले स्रोत असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही तुमच्या आहारात अंडी, मासे, पालेभाज्या,सुकामेवा, पनीर, दूध यासारख्या अनेक पदार्थांचा समावेश करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections साठी MNSची जय्यत तयारी; मुंबईत पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार! 'या' दिवशी होणार सभा

Sultan of Johor Cup साठी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नेतृत्व अमीरकडे, जाणून घ्या वेळापत्रक आणि संघ

Haryana Assembly: हरियाणात विजय मिळाल्यास, काँग्रेसला 'या' पाच मुद्यांवर 'बूस्टर' मिळणार

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

SCROLL FOR NEXT