Vitamin B12  esakal
आरोग्य

Vitamin B12 : हाडांचा ठिसूळपणा अन् स्नायूंची कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन B12 फायदेशीर, 'असा' करा आहारात समावेश

Vitamin B12 Healthy Drinks : व्हिटॅमिन B12 हे जीवनसत्व आपल्या शरीरातील मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर मानले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Vitamin B12 : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये पोषकघटक, जीवनसत्वे आणि खनिजांचे विपुल प्रमाण असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन B12 हे जीवनसत्व आपल्या शरीरातील मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर मानले जाते.

जर या जीवनसत्वाची शरीरात कमतरता असेल तर, मग अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे इत्यादी समस्या सुरू होतात. त्यामुळे, आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. व्हिटॅमिनी B12 ची ही कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात काही हेल्दी ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करू शकता. कोणते आहेत हे हेल्दी ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात.

बीट ज्यूस

तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात बीट आणि बीटाचा रस समाविष्ट करू शकता. बीटामध्ये लोह, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटॅमिन डी देखील आढळते. त्यामुळे, आपल्या शरीरातील हिमोग्लोबीनचे आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते. शिवाय, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी हा बीटाचा ज्यूस अतिशय फायदेशीर आहे.

गाईचे दूध

गाईचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे, मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी गाईच्या दुधाचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा. त्यामुळे, या दुधाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. विशेष म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबीची समस्या ही उद्भवत नाही.

सोया मिल्क

व्हिटॅमिन B12 चा प्रमुख स्त्रोत म्हणून सोया मिल्कला प्रामुख्याने ओळखले जाते. हे सोया मिल्क आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे सोया मिल्क तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. साधारण दुधाच्याऐवजी मार्केटमधून हे फोर्टिफाईड सोया मिल्क खरेदी करा आणि त्याचा आहारात समावेश करा. या दुधामुळे, प्रथिनांची कमतरता आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकेल.

संत्र्याचा ज्यूस

संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी संत्र्याचा ज्यूस अवश्य प्या. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे विपुल प्रमाण आढळते. शिवाय, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12 चा प्रमुख स्त्रोत म्हणून संत्र्याकडे पाहिले जाते. त्यामुळे, संत्र्याचा ज्यूस आहारात अवश्य समाविष्ट करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan: सलमाननंतर आता शाहरुख खानला धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी ट्रेस केला कॉल

'लोकसभेत आमचा पराभव झाला असला, तरी विधानसभेत महायुतीचे 180 आमदार निवडून येणार'; रावसाहेब दानवेंना विश्वास

Ajit Pawar: पवारांवर बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली, अजित पवार भडकले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

PM Internship Scheme साठी नोंदणीची अंतिम तारीख जवळ, लवकरच अर्ज करा, जाणून घ्या कसा?

Latest Maharashtra News Updates : अभिनेता शाहरुख खानला धमकी

SCROLL FOR NEXT