मधुमेह किंवा हायपरटेन्शनसारख्या एनसीडीने ग्रस्त रूग्णांसाठी व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाचे आहे.कारण त्यामुळे अवयवाचे नुकसान टाळता येते आणि व्हॅक्स्क्युलर कार्यात सुधारणा होते त्याखेरीज रूग्णांची स्थिती गंभीर बनवणारे हंगामी ऋतूतील संसर्गही त्यामुळे कमी होतात
मुंबई : मागील दोन वर्षांनी चांगले आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले आहे. हे आत्ताच महत्त्वाचे नाही तर दीर्घकाळातही हंगामी संसर्ग आणि असंसर्गजन्य आजारांसाठी (एनसीडी) साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतातील एनसीडीचा उद्भव हा अत्यंत तीव्र स्वरूपात वाढू लागला आहे. मागील तीन दशकांत मृत्यूदर ८३ टक्क्यांनी वाढला आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह हे आघाडीचे एनसीडी आहेत जे भारतीयांना बाधित करतात आणि सर्वाधिक मृत्यूदराशी संबंधित आहेत. एनसीडीने बाधित दोन तृतीयांश भारतीय सर्वाधिक उत्पादक वयोगटात (२६ ते ५९ वर्षे) दिसतात असे २०२१च्या असोकेमच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यातील मधुमेह आणि हायपरटेन्शन हे प्रामुख्याने ताणाशी संबंधित आहेत आणि त्यांचे अस्तित्त्व भारतभरात अनुक्रमे २.९ टक्के आणि ३.६ टक्के आहे.
चांगल्या एनसीडी व्यवस्थापनासाठी चांगला आहार आणि पोषण यांसोबतच उत्तम आरोग्य राखण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याच्या उपक्रमांची पूर्ण गरज आहे. चांगल्या पोषणासाठी एक सकस संतुलित आहार अत्यावश्यक आहे. त्याचवेळी देशाचे पोषण सेवन एकूणातच अपुरे आहे. लोकांचे विद्यमान आहार कुपोषणात भर घालत आहेत आणि एनसीडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. व्हिटॅमिन सी (किंवा एस्कॉर्बिक एसिड) मानवांमध्ये एक अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक ठरते आणि ते प्रतिकारयंत्रणेच्या विविध घटकांना आधारभूत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट म्हणून ते शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीलाही मजबूत करते.
मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, ''व्हिटॅमिन सी 'हा' प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या सामान्य एनसीडी असलेल्या रुग्णांना इतरांपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आवश्यक असू शकतात. व्यक्ती व्हिटॅमिन सी पूरक आहाराद्वारे आपल्या नियमित पोषण इनटेक वाढवू शकतात आणि त्याचबरोबर लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटोंसह समृद्ध, संतुलित आहाराचेही सेवन करू शकतात.''
ग्लोबल मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. पराग शेठ म्हणाले की, “व्हिटॅमिन सी मधून विविध प्रकारचे आरोग्याचे फायदे मिळतात. जसे प्रतिकारशक्ती आणि अँटीऑक्सिडंटच्या पातळ्या वाढवणे. एबॉट व्हिटॅमिन सीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्याद्वारे पुरेसा रोजचा आहार घेणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिकारशक्तीला फायदा मिळेल आणि एकूणच आरोग्य तसेच प्रकृती सुधारू शकेल. अधिक विशिष्ट स्थानिक गरजांसाठी विश्वासू, दर्जेदार उपाययोजना देऊन आम्ही लोकांना चांगले आरोग्य आणि अधिक चांगले, समृद्ध जीवनमान देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
देशभरात व्हिटॅमिन सीची कमतरता दिसून आली आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात अनुक्रमे सुमारे ७४ टक्के आणि ४६ टक्के कमतरता आढळली आहे. ही कमतरता प्रामुख्याने एनसीडीने ग्रस्त लोकांमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीसाठी प्रतिकारशक्तीची पातळी कमी दिसून येते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी सामान्य धोक्याच्या घटकांमध्ये वाढलेले वय (विशेषतः गॅरिएट्रिक लोकसंख्या), कुपोषण, प्रदूषण किंवा धूर, बायोमास इंधने यांच्या संपर्कात येणे, तंबाखूचे सेवन या गोष्टी कारण ठरतात आणि भारतीयांमध्ये या बाबी आढळून येतात.
व्हिटॅमिन सी विशेषतः एनसीडीने ग्रस्त लोकांमध्ये हंगामी संसर्ग दूर करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. जसे हिवाळ्यातील सर्दी आणि खोकला. कार्डिओव्हॅस्क्युलर आजार किंवा हायपरटेंशनच्या रूग्णांमध्ये पोषक घटक अवयवाच्या नुकसानाचे रक्षण करू शकतात आणि व्हॅस्क्युलर एन्डोथेलियल कार्ये सुधारू शकतात. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्यांचे नियमन होण्यास मदत होते. पोषक घटकांचे सुयोग्य सेवन करून व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचे फायदे निश्चित करण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या पूरक आहाराचा फायदा होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.