Is Walking Impactful To Reduce Belly Fats : अनेकदा व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांचे वजन वाढण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. शिवाय बैठे काम वाढल्याने पोटाचा आणि कंबरेचा घेरही वाढलेला दिसतो. त्यामुळे यावर सोपा आणि प्रभावी उपाय म्हणून चालण्याचा व्यायाम करण्यावर अनेकांचा भर असतो.
पण चालण्याने खरंच पोटाची चरबी कमी होते का? असा अनेकांचा प्रश्न असतो. याविषयी तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.
चालण्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत हे आपल्याला आधीच माहित आहे. सकाळी किंवा संध्याकाळ, हवे तेव्हा चाला, कारण याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर खूप मदत होऊ शकते. चालण्याने कॅलरी बर्न होण्यास आणि निरोगी चयापचय राखण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी याचा कसा फायदा होतो जाणून घेऊया.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या २०१४ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या स्त्रियांना लठ्ठपणा आहे त्यांना आठवड्यातून किमान तीन वेळा ५० ते ७० मिनिटे असे १२ आठवडे चालण्यास सांगितले होते. सरासरी, त्या महिलांची पोटाची चरबी आणि शरीराची चरबी कमी झाली.
हेल्थ शॉट्सने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीचे फीटनेस आणि न्यूट्रिशन कोच अभी सिंग ठाकूर यांनी सांगितले की, सरासरी ७० किलोग्रॅम वजनाची व्यक्ती ३० मिनिटे मध्यम गतीने (सुमारे ३.५ मैल प्रति तास) चालल्याने अंदाजे १४९ कॅलरीज बर्न करू शकते. अर्थात, व्यक्तीनुसार संख्या बदलू शकते.
चालण्याचा व्यायाम चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकत असला तरी किती प्रमाणात आणि किती वेगात हा परिणाम दिसून येईल हे व्यक्तीवर अवलंबून असते. यासाठी व्यक्तीचे सध्याचे वजन, शरीर रचाना, जीवनशैली आणि आहार हे घटकही महत्वपूर्ण ठरतात.
चालणे हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि त्यामुळे कॅलरीज बर्न होतात. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की स्पॉट रिडक्शन, जे विशिष्ट क्षेत्रातून चरबी कमी करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे शक्य नसते, असं तज्ज्ञ सांगतात. पोटाची चरबी प्रभावीपणे कमी करण्यासाठी, संपूर्ण वजन कमी करणे आणि शरीरातील चरबी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.
पोटाची चरबी प्रभावीपणे कमी करण्यासाठी आणि तुमचा एकंदर तंदुरुस्ती वाढवण्यासाठी, इतर व्यायाम आणि जीवनशैलीच्या समायोजनासह चालणे फायद्याचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.