watermelon for male performance esakal
आरोग्य

Watermelon For Male Performance : पुरूषांना ‘ती’ गोळी घेण्याची गरज नाही, कलिंगडच करेल मदत,कसे ते वाचा

What increases male sexual performance? मित्रांनो, आजच कलिंगड खायला सुरू करा, होतील भन्नाट बदल

Pooja Karande-Kadam

Watermelon For Male Performance :  

अन्न पदार्थासोबतच हवा आणि पाणी आपली प्राथमिक गरज आहे. त्यानंतर कपडे आणि निवारा या गोष्टी आहेत. यासोबतच चांगलं आरोग्य ही आपली सर्वात महत्त्वाची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी रक्त शुद्ध असणंही तितकच गरजेच आहे.

आजकाल पुरूषांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्टामिना कमी असणे. सतत थकल्या सारखे वाटणे होय. त्यांच्या या समस्येमुले थेट त्यांच्या वैवाहीक जीवनावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत त्यांना कलिंगडचा आधार मिळू शकतो.

 सध्या पुरूषांमध्ये कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढले आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशक्तपणा येतो. तर त्या ब्लॉकही होतात. कोलेस्ट्रॉल जमा होते तेव्हा रक्ताचा वेग मंदावतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि पुरुषांना या समस्येला खूप सामोरे जावे लागते.

टरबूज हा आजार आटोक्यात आणू शकतो. आणि उच्च बीपीच्या गोळ्या किंवा कॅप्सूलपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. कारण उन्हाळ्यातील या फळामध्ये असे गुणधर्म असतात, ज्यामुळे शिरा रुंद होतात. चला जाणून घेऊया टरबूज खाण्याचे सर्व फायदे.

WHO च्या मते जगात सर्वाधिक लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होतो. ज्याचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब आहे. एका संशोधनानुसार, टरबूजमध्ये सायट्रुलीन नावाचे अमीनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईड वाढवून नसा मोकळ्या करते.

यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.बहुतेक आजार शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होतात. पण या फळात लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे जळजळ दूर करतात आणि संरक्षण देखील करतात.

शरीरातील नस ब्लॉक होण्याचे प्रमाण वाढल्याने हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते

डोळ्यांसाठी फायदेशीर

लायकोपीन डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील फायदेशीर आहे. हे वयानुसार डोळ्यांचे आरोग्य बिघडण्यास प्रतिबंध करते. यामुळे डोळ्यांच्या पेशी निरोगी राहतात आणि म्हातारपणातही प्रकाश कमी होत नाही.

वर्कआऊटसाठी एनर्जी देते

पुरुषांची कामगिरी उत्कृष्ट असेल सिट्रुलीन हे व्यायामाची कार्यक्षमता वाढवणारे देखील आहे. वर्कआऊटनंतर होणारा त्रास आणि कडकपणा टरबूज खाल्ल्याने दूर होतो. एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की 7 दिवस सतत सिट्रुलीन घेतल्याने हा फायदा होतो.

उष्णतेच्या त्रासावर गुणकारी

शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. जे उष्माघातानेही प्राणघातक ठरू शकते. पण टरबूजच्या आत भरपूर पाणी असते, जे पाण्याची पातळी राखते आणि उष्णतेपासून संरक्षण करते.त्याच्या बिया देखील फायदे देतात.

कमी कॅलरीज

टरबूजच्या बिया कमी-कॅलरी असलेले अन्न आहे, जे मॅग्नेशियम, लोह, चांगले फॅट्स, झिंक इ. प्रदान करतात. आहेत. तुम्ही ते भाजल्यानंतरही खाऊ शकता आणि कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी टरबूज मर्यादित प्रमाणात खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT