आरोग्य

ओमिक्रॉनचा सामना करताना तुमच्या मुलांचे मानसिक आरोग्य कसे जपावं?

मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांना काय करता येईल?

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळात मुलांचे मानिसक आरोग्याबाबत पालकांची चिंता वाढली आहे. सोशल डिस्टसिंग, ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन लेक्चर करणे, मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीच्या वापरामुळे वाढलेला स्क्रिन टाईम, सतत पालकांसोबत राहून आलेला कंटाळा या सर्वामुळे त्यांच्या मनावर ताण निर्माण होत आहे. मुलांच्या भावनिक गरजा समजून घेण्यासाठी पालकही कमी पडत असल्यामुळे आणि घरात, सोशल माध्यमाध्यमाद्वारे होणारा संवादही कमी झाल्यामुळे त्यांच्या मनावरील ताण वाढत आहे. ( 9 ways of protecting your child’s mental health in face of COVID Omicron variant)

काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंटच्या संक्रमणामुळे जग चिंतेत होते आणि आता वर्षभरानंतर पुन्हा नविना आणि अधिक वेगात संक्रमित होणारा ओमिक्रॉन व्हेरिअंट आला आहे. सारे जग वेगवगेळ्या टप्प्यांमध्ये कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सतत सामना करत आहे. सायंटिफिकि कम्युनिटी कोरोना व्हेरिअंटसंबधीत विविध गुंतागुंत समजून घेण्यासाठी दिवस रात्र काम करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण जे आहे ते मान्य करण्याऐवजी सगळं पुन्हा नीट कधी होणार याची आशा बाळगत आहोत. आपल्याला कोरोना महामारीसोबत सामना देत राहायचे असेल तर त्यासाठी आपल्याला वास्तविकता स्विकारावी लागेल.

मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांना काय करता येईल? (how parents can help to improve a child’s mental health)

⦁ स्क्रिन टाईम कमी करा ( Limit Screen Time) स्क्रिम टाईम कमी करण्यासाठी तुमच्या मुलांवर जबरदस्ती केल्याने तुम्ही चांगले पालक बनणार नाही. कित्येक संशोधन अभ्यासत हे सिद्ध झाले आहे की, स्किन टाईम वाढल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणामा होतात जसे की , ताण वाढण, चिंता, सोशल डिस्टसिंग, शारिरीक थकवा आणि डोळ्यावर येणारा ताण. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे की ते वेगवेगळ्या डिव्हाईस स्किनवर किती वेळ घालवतात, विशेषत: झोपेच्या आधी. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस बंद करुन आपल्या मन आणि शरीराला आराम मिळाला पाहिजे. झोपण्यापूर्वी वाचण करणे किंवा मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला शांत आणि छान झोप लागू शकतो.

विविध विषयांवर चर्चा करा. (Discuss On Different Topics)

आज पण सध्या ज्या काळात जगत आहोत, त्या सर्व वृत्त माध्यमे आणि सोशल मिडियावर आपल्याला दररोज फक्त महामारी संबधितच माहिती मिळत आहे. प्रत्येक नवीन गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे विशेषत: लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत, पण तुम्ही सध्या जगात सुरु असलेल्या ताज्या घडमोडींच्या नादात आपल्या जवळच्या लोकांसोबत क्वालिटी टाईम घालवणे विसरत आहात. तुमच्या मुलांना अशा वेळी त्यांच्या आवडीच्या विषयांबाबत पालकांशी बोलाव असावे असे वाटत असते. नव्या व्हेरिअंटआणि लॉकडाऊनबाबत चर्चा केल्यामुळे तुमच्या घरात नॉर्मल वातावरण राहिलल आणि तुमचे नाते सुधारण्यासाठी मदत होईल. मुव्ही, स्पोर्ट किंवा मनाला चांगले वाटेल अशा विषयांवर चर्चा करा आणि तुम्ही चर्चा करत असलेल्या विषयांमध्ये मुलांसह सर्वांना इंटरेस्ट आहे याची काळजी घ्या.

शांत रहा (Be Calm)

सुरक्षा आणि समाधान मिळविण्यासाठी मुल नेहमी आपल्या पालकांवर निर्भर असतात. तुम्ही त्यांचे काळजी घेणारे आणि आदर्श असता त्यामुळे गोंधळाच्या वातावरणामध्ये शांत राहणे हेल्दी लाईफस्टाईलसाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा पण पॅनिक होऊ नका. ताण वाढल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि आरोग्यावरही परिणाम होतो.

फिटनेस आणि फिजीकल अॅक्टिव्हिटी ( Fitness & Physical Activities)

तुमचा ताण कमी करण्यासाठी आणि तुमच्या मनाला थोडा आराम मिळवा यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. जेव्हा तुम्ही फिजिकली अॅकटिव्ह असता तेव्हा तुमच्या मेंदुमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते ज्यामुळे तुमचा मुड फ्रेश होते. फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे तुमचे शरीर निरोगी राहते. योगा हा खूप चांगला मार्ग आहे ज्यासाठी खूप कमी जागा लागते आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुमचा मन आणि शरीराला आराम मिळतो. कुटुंब म्हणून फिजिकली फिट राहण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे बॉन्ड चांगले राहते. तुमच्या कुटंबातील सर्वांनी मिळून एकत्र फिजिकल अॅक्टिव्ही करणे नक्कीच फायदेशीर ठरेल. ⦁ ध्यान (Meditation) बहुतांश लोकांना जेवढे अवघड वाटते त्यापेक्षा ध्यान करणे बरेच सोपे आहे आणि तुमच्या मनातील सर्व भिती कमी करण्यासाठी ध्यान करणे फायदेशीर ठरू शकते. असंख्य वैद्यकीय संशोधन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, ध्यान करण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्यापैकी सर्वात उपयुक्त म्हणजे चिंता कमी करणे आणि विश्रांतीचा मिळणे. नियमितपणे ध्यान करणाऱ्या लोकांमध्ये तणाव पातळी खूप कमी असते. दिवसभरात 5-10 मिनिटे वेळ काढून सुरुवात करा आणि सतत सराव करा. ध्यान करण्यामुळे तुम्हाला खूप आनंदी आणि अधिक शांत वाटेल. कोणीही ध्यान करू शकते. विद्यार्थ्यांसाठी ध्यान करणे खूप फायदेशीर असते. जे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडथळा येत आहे किंवा कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधाचा त्रास होत आहे त्यांनी घ्यान केले पाहिजे.

तुमच्या दिवसाचे नियोजन करा. ( Plan Your Days)

तुमच्या मुलांना दिवस कसा घालवायचा याचे नियोजन करण्यास मदत करा. कोरोना महामारीमुळे मुलांचे रोजचे दिवसाचे शेड्युल पूर्णपण बिघडले आहे हा खूप वाईट परिणाम झाला आहे. मुलांच्या सुट्या बदलल्या आहे आणि त्यामुळे त्यांचे बरेच प्लॅन्स देखील रद्द झाले आहे. तुम्ही तुमचा दिवसाचे नियोजन करून तुम्ही नवीन लाईफस्टाईल स्विकाराला शिका. रोजचे टास्क, अॅक्टिव्हिटी, मुलांना खेळण्यासाठी थोडा वेळ, तसेच कामासाठी थोडा वेळा आणि तुमच्यासोबतही काही वेळ घालविण्याचे नियोडन करा. तुमच्या कामामध्ये हरवून जाऊ नका आणि सर्वजण सहभागी होऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात अशा फॅमिली अॅक्टिव्हिटीसाठी वेळ काढा. तुमचा संपूर्ण दिवस कसा चांगला जाईल याची काळजी घ्या.

तुमच्या मित्र-परिवाराशी बोला (Talk to Family and Friends) :

बऱ्याच वेळा, बोरडमपासून स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात, आपण तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत चित्रपट पाहून किंवा गेम खेळून वेळ घालवतो पण, प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधणे विसरून जातो. बर्याचदा,तुमच्या माणसांच्या गर्दीमध्ये एकटे असून शकता. त्यामुळे तुमच्या भल्यासाठी हे खूप गरजेचे आहे की, तुम्हाला जाणवणारी प्रत्येक भावना आणि प्रत्येक विचाराबाबत तुमच्या विश्वासातील लोकांसोबत उघटपणे चर्चा केली पाहजे. माणूस हा सामाजिक प्राणी आहेत आणि तुम्ही जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. आपल्याला एक समाज म्हणून, तुमच्या भावना दुखवल्या जात आहे किंवा वाईट वाटत आहे अशा stereotype विचारांपासून मुक्त होणे गरजेचे आहे. भावनिक दडपणामुळे देखील बऱ्याचदा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या मुलांना कोणताही सल्ला किंवा उपदेश न देता तुमच्या मुलांना काय वाटतेय हे ऐकण्याची स्वत:ला सवय लावा आणि स्वत:चे मत व्यवस्थित मांडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT