Weight Loss Tips Sakal
आरोग्य

Weight Loss Tips : शरीराचे वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग या गोष्टी फॉलो केल्यास नाही वाढणार वजन

Weight Loss Tips : शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काही साध्या-सोप्या टिप्स जाणून घेऊया.

Harshada Shirsekar

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश जीम, योग क्लासमध्ये घाम गाळतात. डाएट - वर्क आऊट रूटीन काटेकोरपणे फॉलो करून ही मंडळी शरीराचे वाढलेले वजन तर कमी करतात, पण वजन नियंत्रणात ठेवणे काही जणांना कठीण जाते. म्हणूनच कधी-कधी शरीराचे वजन वाढते आणि घटते सुद्धा.  

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीर फिट राहावे, यासाठी काही साध्या-सोप्या टिप्स आपण फॉलो करू शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी अधिकची मेहनत घेण्याचीही आवश्यकता नाही. तर वजन नियंत्रणात   (Weight Loss Tips In Marathi) ठेवण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये काही खास बदल करावे लागतील, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती...

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स (How to maintain weight in Marathi) 

जेवणाची योग्य वेळ  

खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, हे बहुतांश जणांना जमतच नाही. पण वेळेवर जेवण करण्याची सवय लावल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतील. आपणास सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवणाचे सेवन वेळेवर करायचे आहे, हे लक्षात ठेवा. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. 

पाणी पित राहा

शरीर हायड्रेट राहणे अतिशय गरजेचं आहे. शरीर जितके हायड्रेटेड राहील, तितकेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. पाणी प्यायल्याने विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. आपण डाएटमध्येही पाणीयुक्त फळांचा समावेश करू शकता. 

चालण्याचा व्यायाम करा  

चालण्याचा व्यायाम केल्यास तुमच्या संपूर्ण शरीराला भरपूर फायदे मिळतील. चालण्यासाठी तुम्हाला अधिकची मेहनत घ्यावी लागणार नाही. नियमित कमीत कमी एक तास आपण चालण्याचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा.

रात्री पचनास हलका असलेला आहार घ्यावा  

रात्रीच्या वेळेस पचनास हलका असेल अशा आहाराचे सेवन करावे. कारण यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. आपण ८ वाजण्यापूर्वीच रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करावा. रात्री उशीरा जेवण केल्यास पचनप्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.

पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे

शरीराचे वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर शारीरिक व मानसिक ताणतणाव देखील कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याव्यतिरिक्त पुरेशा प्रमाणात झोप घेणेही गरजेचं आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT