Weightloss Resolution esakal
आरोग्य

Weightloss Resolution : कडाक्याच्या थंडीत मॉर्निंग वॉक कशाला? घरातच कमी करा वजन

हिवाळ्यात सकाळी लवकर उठून, बाहेर पडून व्यायाम करणं बऱ्याचदा शक्य होत नाही. या ट्रिक्सने घरातच वजन करता येणार कमी.

सकाळ डिजिटल टीम

Lose Weight At Home Only : असं म्हणतात हिवाळा हा ऋतू आरोग्य बनवण्याचा ऋतू आहे. त्यात नवीन वर्षीची सुरुवात झाली. अनेकांनी वजन कमी करण्याचा संकल्पही केला असेल. पण सध्या सगळीकडे आलेली थंडीची लाट, त्यामुळे घराबाहेर पडणं कठीण होतं.

तसंही गारव्यामुळे आळस वाढतो. अशा स्थितीत वजन कमी करण्याची दिनश्चर्या पाळणं थोडं कठीण होतं. त्यामुळे जर तुम्हाला घरीच राहून वजन कमी करायचं असेल तर काही खास ट्रिक्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

काय आहेत उपाय?

  • सकाळी उठल्यानंतर लगेच कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायाल्याने शरीर डिटॉक्स होते आणि वजन नियंत्रणात राहते.

  • सकाळच्या नाश्त्यात हेवी काही खाण्याऐवजी इडली, पोहे असे हलके पदार्थ खा.

  • वजन कमी करण्यासाठी दूधाचा चहा टाळा आणि ग्रीन टी घ्या. यामुळे चांगले परिणाम दिसतील.

  • दुपारच्या जेवणात सलाडचा समावेश अवश्य करा. गाजर काकडीची कोशिंबीर ही जशी तोंडाला चव आणते तशीच ती आरोग्यासाठीही पोषक असते.

  • दिवसभराची भूक भागवण्यासाठी भिजवलेले बदाम खा. त्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण होण्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होईल.

बडीशेप खडीसाखर खा

रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप, खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते. त्यामुळे अन्नामध्ये चरबीच्या रुपात असलेले कार्बोहायड्रेट्स गोठत नाहीत.

शतपावली न विसरता करा

जेवल्या बरोबर एका जागी बसू नका. किमान १५ ते ३० मीनिटं शतपावली करा. त्यामुळे अन्न पचन योग्यरित्या होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT