quitting smoking benefits for mental health sakal
आरोग्य

Quitting Smoking Benefits धूम्रपानाचे व्यसन सोडल्यास मानसिक आरोग्यावर होतील हे परिणाम - रीसर्च

धूम्रपान करणे सोडल्यास मानसिक आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती...

Harshada Shirsekar

‘धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक असते.’

 ‘धूम्रपान स्वास्थ्य के लिए हानिकारक है!’

‘Smoking Is Injurious To Health It Causes Cancer’

धूम्रपानासंदर्भातील अशा वेगवेगळ्या भाषांमधील जाहिराती आपण आजवर पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. सिगारेट, तंबाखूच्या पाकिटावरही अशाच स्वरुपात अ‍ॅलर्ट करणारा मेसेज छापलेला असतो. पण सिगारेटची लागलेलं व्यसन सोडवणं काही जणांसाठी अशक्यच असते.

कमालीची बाब म्हणजे बहुतांश जण मानसिक ताण कमी व्हावा, यासाठी सिगारेट ओढतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का? धूम्रपानामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम पाहायला मिळतातच व मानसिक आरोग्याशी संबंधित संकटांना देखील आपण आयते निमंत्रण देत आहात, हे लक्षात घ्या मित्रांनो.

अ‍ॅलर्ट! मनावरचा ताण कमी होत नाहीय, तर वाढतोय

तर या सो कोल्ड ‘De- stressor’ पर्यायामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाही तर अधिक वाढतोय. हे तोटे लक्षात घेता, सिगारेट ओढण्याच्या सवयीवर आपण वेळीच नियंत्रण मिळवलं तर तुमच्या मानसिक आरोग्यास फायदेच फायदे मिळू शकतात. अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी पाहूया एका केसस्टडीमधील माहिती…

सिगारेट ओढल्याने मन आणि मेंदू चिंता-ताणतणावातून शांत होतो, असा काहींचा गोड गैरसमज आहे. खरंतर सिगारेटमधील घातक घटकांमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होताहेत. 

‘मिरर’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने धूम्रपानाशी संदर्भात सादर केलेल्या माहितीनुसार, मानसिक आजार असलेल्या व नसलेल्या लोकांनी धूम्रपान करणं सोडल्यानंतर त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. 

धूम्रपान करणं थांबवल्यानंतर नऊ ते 24 आठवड्यांदरम्यान लोकांमधील चिंता आणि नैराश्याची समस्या कमी होऊन मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसले. एकूणच लोकांच्या मानसिक आरोग्यात चांगले बदल घडू लागले.

वर्ष 2011 ते 2015 दरम्यान 16 देशांमधील नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये मानसिक रूग्ण असलेले व नसलेले पण धूम्रपान करणाऱ्या अशा एकूण 4 हजार 260 लोकांचा अभ्यास करण्यात आला होता. यापैकी 55.4 टक्के लोकांमध्ये मानसिक आजार असल्याचे आढळले.  

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर Paul Aveyard यांनीही म्हटलं की, 'जेव्हा लोक धूम्रपान करणे सोडतात, तेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि जी मंडळी ही सवय सोडत नाही, त्यांच्या मानसिक आरोग्यात कोणतेही बदल होताना दिसत नाही, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे'.

मानसिक आजारांचा वाढू शकतो धोका

  • धूम्रपान करणाऱ्यांमध्ये नैराश्य आणि स्किझोफ्रेनिया (schizophrenia) यासारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

  • स्मोकिंगमुळे मानसिक तणाव कमी होत नाही तर अधिक वाढते. 

  • डोकेदुखीची समस्या वाढते.

  • स्वभावात चिडचिडेपणा वाढतो. 

धूम्रपान सोडण्याचे पर्यायी मार्ग

धूम्रपानाची सवय सोडणे मुळीच सोपे नाही. पण यास पर्याय असणाऱ्या गोष्टींचा वापर केल्यास सिगारेट सोडणे नक्कीच शक्य आहे. बाजारात अशा कित्येक गोष्टी सहजरित्या उपलब्धही असतात. उदाहरणार्थ च्युइंगम, माऊथ स्प्रे, समुपदेशन (Counseling) इत्यादी...

तर मग मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर धूम्रपानाच्या सवयीवर वेळीच नियंत्रण मिळवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT