French Fries  sakal
आरोग्य

French Fries Side Effects: फ्रेंच फ्राईज खायला आवडतं? तर सावधान! होऊ शकतात या 5 समस्या

फ्रेंच फ्राईजचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते.

Aishwarya Musale

लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत फ्रेंच फ्राईज हा सर्वांचा आवडीचा पदार्थ. आपण कुठेही फिरायला गेल्यावर, हॉटेलमध्ये हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. एकवेळ बटाटा आवडत नाही पण फ्रेंच फ्राईज मात्र नक्की खाल्ले जातात. 

फ्रेंच फ्राईज नियमितपणे खाल्ल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. फ्रेंच फ्राईजचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, सुमारे 4500 तरुणांवर अभ्यास केला असता धक्कादायक निष्कर्ष समोर आले. असे सांगण्यात आले की जे लोक आठवड्यातून दोनदा फ्रेंच फ्राईज खातात, त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका दुपटीने वाढतो.

1. पोटाचा त्रास

फ्रेंच फ्राईजचे पचन प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत खूपच मंद असते कारण त्यात जास्त कॅलरीज असतात. याचे नियमित सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. याशिवाय जुलाब, उलट्या आणि गॅसची समस्याही उद्भवू शकते.

2. मेंदूसाठी चांगले नाही

फ्रेंच फ्राईज तुमच्या मेंदूसाठी चांगले नाहीत कारण हायड्रोजनेटेड तेल आणि फ्राईजमध्ये भरपूर ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे अल्झायमर रोगाचा धोका वाढतो आणि स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या वाढते.

3. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम

फ्रेंच फ्राईजचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होतो कारण काहीवेळा अशा अन्नातील अस्वास्थ्यकर जीवाणू तुमच्या आतड्याच्या मायक्रोबायोमला हानी पोहोचवतात. यामुळे तुमची रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते.

4. हृदयविकाराचा धोका

फ्रेंच फ्राईज सतत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त तळलेल्या अन्नामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि 'ट्रिपल वेसल डिसीज' सारखे गंभीर आजार होतात.

5. तुमचे वजन वाढेल

वजन वाढणे ही आजकाल एक कॉमन समस्या आहे, फ्रेंच फ्राईज सतत खाल्ल्याने पोट वाढते तसेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT