What is body detoxification : आपलं शरीर हा एक कारखाना असून त्यात आपण जे अन्न पाणी घालत असतो त्याच्या पचनानंतर शरीरातील इतर घाण लघवी आणि विष्टे वाटे बाहेर टाकली जाते हे आपल्याला माहित आहे. पण या शिवायपण इतर घाण डिटॉक्सीफिकेशनच्या माध्यमातून स्वच्छ केली जाते.
शरीरातील घाण डिटॉक्स ही शरीर आणि मेंदूला निरोगी ठेवण्याची प्रक्रिया आहे. याने मानसिक तणाव आणि इतरही आजार दूर ठेवता येतात. तसेच याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते. बॉडी डिटॉक्सीफिकेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे डिटॉक्स प्रोग्रॅम सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कधी असते गरज?
घाण केवळ आपल्या आजूबाजूला असते असे नाही तर आपल्या शरीरातही असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागतो. त्यात तणाव, झोप न लागणे, थंडी वाजून ताप येणे, पचन न होणे आणि वजन वाढणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. वेळेवर यांच्यावर उपाय केले गेले नाही तर हे आजार गंभीर रुप धारण करु शकतात.
झोन न येणे
जर तुम्हाला चांगली आणि झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात विषारी तत्वांचा प्रवेश झाला असे समजा. यासाठी भरपूर झोप घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करा. झोप चांगली लागली तर दिवसभर तुम्हाला चांगली एनर्जी मिळते. झोप पूर्ण न झाल्यास डोकं जड होणे, आळस येणे, कशात मन न लागणे याही समस्या होतात.
आळस येणे
आळस आल्याने दिवसभर कशातही लक्ष न लागणे. कोणतही काम करताना ऊर्जा नसणे हे तुमच्या शरीरावर विषारी तत्वांनी ताबा मिळवला याचे संकेत आहेत. अशात मद्यसेवन, साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, प्रोसेस्ड फूड टाळा. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर असतं.
तणाव असणे
विषारी तत्वांमुळे सतत तणाव जाणवतो. तणावामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात. पर्यावरणातील प्रदूषण, किटकनाशके तसेच जंक फूडमुळे तणाव वाढतो. तणावामुळे शरीरात विषारी तत्वांचा प्रभाव वाढतो, याला टॉक्सीक फ्रि रॅडिकल्स म्हटले जाते.
वजन वाढणे
वजन वाढणे हे सुद्धा तुमच्या शरीरात विषारी तत्त्व वाढले याचा संकेत आहे. जास्त करुन आहाराच्या चुकीच्या सवयीं असणारे लोक या समस्येने पीडित असतात. हे लोक खातात-पितात जास्त. जेवढ्या जास्त कॅलरी ते घेतात तितक्या कमी खर्च करतात. त्यामुळे कॅलरी ऊर्जेला चरबीच्या रुपात जमा करुन वजन वाढतं. अशावेळी तेवढंच खावं जेवढं तुम्ही पचवू शकता.
पचनक्रिया बिघडणे
ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया जी बिघडली की समजा तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. पोटात गॅस होणे, अपचन, जळजळ होणे, वेदना, उलटी होणे इत्यादी याची लक्षणे आहेत. शरीरात असलेली घाण यातून बाहेर येतो. पोट हे सर्व समस्यांचं मूळ आहे. त्यामळे पोटासोबत उगाच प्रयोग करु नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.