Social Anxiety : ज्या लोकांना सतत घरातच रहायला आवडते किंवा ज्यांना घरामध्ये रहायला कम्फर्टेबल वाटते, अशा प्रकारचे लोक सोशल फोबिया किंवा सोशल एंग्जायटीच्या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता असते.
जे लोक सोशल एंग्जायटीकडे एक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. अशा लोकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, ही एक सामान्य समस्या नसून हा एक गंभीर आजार आहे.
सोशल एंग्जायटी हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जर्नल ऑफ एंग्जायटी डिसऑर्डरच्या एका अहवालानुसार जगभरातील एकूण ७% लोक हे सोशल एंग्जायटी या आजाराने पीडित आहेत. या आजारातून सुटका मिळवणे हे शक्य आहे.
मात्र, त्याआधी आपण सोशल एंग्जायटी म्हणजे काय? आणि याची लक्षणे कोणती? त्याबद्दल आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
सोशल एंग्जायटी ही एक प्रकारची सामाजिक भीती आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती ही लोकांना भेटताना किंवा लोकांशी बोलायला घाबरते आणि त्या परिस्थितीशी संबंधित नकारात्मक आणि अतार्किक गोष्टींचा विचार करते. ज्यामुळे, त्या व्यक्तीला लोकांमध्ये स्वत:ला व्यक्त करणे हे आव्हानात्मक वाटते आणि त्या व्यक्तीला लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटते.
सोशल एंग्जायटीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लोकांमध्ये जाण्याची किंवा पार्टी, घरगुती कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची भीती वाटते. त्यामुळे, या व्यक्ती अशा कार्यक्रमांना जाण्याचे टाळतात.
सोशल एंग्जायटीने ग्रस्त असलेल्या लोकांना या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झाल्यास इतर लोक आपल्याला जज करतील, अशी सतत भीती वाटत राहते.
सोशल एंग्जायटीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला लोकांमध्ये मिसळण्याची आणि लोकांमध्ये जाऊन बोलण्याची भीती वाटते. लोकांसमोर व्यक्त होणे, लोकांसमोर बोलणे इत्यादी गोष्टी त्या व्यक्तीला आव्हानात्मक वाटतात.
अशा परिस्थितीमध्ये सोशल एंग्जायटीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला लोकांसमोर बोलताना घाम येतो, त्यांचा थरकाप उडतो आणि त्यांचे हार्टबीट्स वाढू लागतात इत्यादी शारीरिक लक्षणे देखील दिसू लागतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.