Monsoon Care Tips Sakal
आरोग्य

Monsoon Care Tips: डेंग्यू आणि झिकामध्ये काय फरक आहे? वाचा एका क्लिकवर

Monsoon Care Tips: पावसाळ्यात डेंग्यूचे अनेक प्रकरण समोर येतात. डेंग्यूप्रमाणेच झिकाचे रूग्ण देखील समोर आले असून या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Monsoon Care Tips: भारतात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसांत अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसाळ्यात ज्या आजाराचा सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे डेंग्यू. त्याची प्रकरणे भारतात दरवर्षी आढळतात. या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यूही होतो.

सध्या डेंग्यूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, परंतु दरम्यानच्या काळात देशात झिका विषाणूच्या दोन रुग्णांची पुष्टी झाली आहे. ही दोन्ही प्रकरणे पुण्यात समोर आली आहेत. झिका विषाणू देखील डेंग्यू सारख्या डासांच्या चावण्यामुळे होतो, जरी त्याची प्रकरणे डेंग्यूपेक्षा कमी आहेत, परंतु हा एक धोकादायक रोग देखील आहे.

पावसाळ्यात झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचाही धोका आहे. यामुळे डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. डेंग्यू आणि झिका हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत आणि ते डासांच्या चाव्याव्दारे होतात, परंतु त्यांची लक्षणे आणि शरीराला होणारे नुकसान यामध्ये फरक आहे. या दोन आजारांमध्ये कोणता फरक आहे हे जाणून घेऊया.

Monsoon Care Tips

डेंग्यू आणि झिका मध्ये काय फरक आहे

तज्ज्ञांच्या मते, झिका विषाणू एडिस अल्बोपिक्टस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. हा आजार सांसर्गिक आहे, म्हणजेच हा आजार एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णात पसरतो. झिका संसर्ग कोणालाही होऊ शकतो. जर तो संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आला तर व्हायरस होतो. झिका हा एक प्रकारचा आरएनए विषाणू आहे आणि तो गर्भवती मातेकडून तिच्या बाळाला नाभीसंबधीद्वारे जाऊ शकतो. झिका विषाणू रक्ताच्या संसर्गाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.

जीका व्हायरसचे लक्षण

ताप

शरीरावर पुरळ येणे

शरीरात वेदना होणे

डोके दुखी

डेंग्यू

झिका व्हायरसप्रमाणेच डेंग्यू देखील डास चावल्यामुळे होतो. पण ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही. डेंग्यूची लागण झाल्यावर काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यूचा धोका वाढतो. त्यामुळे डासांची पैदास होण्यासाठी जागा तयार होते. बहुतेक प्रकरणांमध्ये, डेंग्यू एका आठवड्यात बरा होतो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरू शकतो.

लक्षण कोणती

ताप

शरीरात वेदना

डोके दुखी

थकवा जाणवणे

उल्टी

प्लेटलेट्स कमी होणे

कसा बचाव कराल

दोन्ही आजारांपासून बचाव करण्याची घराजवळ पाणी साचू देऊ नका. पुर्ण बाह्याचे कपडे घालावे. घरगुती आणि ताजे पदार्थ खावे. वरील कोणतेही लक्षण दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT