Vegan Diet : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा लोक आताच्या काळात फिटनेसबाबत अधिक दक्ष झाले आहेत. आपला फिटनेस राखण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम, योगा, वर्कआऊट आणि विविध प्रकारच्या डाएट प्लॅन्सची मदत घेतात. सध्या तरूणाईमध्ये व्हीगन डाएटची मोठी क्रेझ पहायला मिळतेय.
वजन कमी करण्यासाठी आणि स्वत:ला तंदूरूस्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटू विराट कोहलीसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी व्हीगन डाएटला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांमध्ये देखील या व्हीगन डाएटची मोठी क्रेझ पहायला मिळतेय. जर तुम्हाला ही हे डाएट फॉलो करायचे असेल तर त्यापूर्वी हे डाएट नक्की काय आहे? आणि त्याचे फायदे काय आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेक लोक शाकाहारी आहारालाच व्हीगन डाएट समजतात. परंतु, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. व्हीगन डाएटमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ टाळले जातात. या व्यतिरिक्त अंडी, मांस आणि मासे हे खाद्यपदार्थ देखील व्हीगन डाएटमध्ये वर्ज्य केले जातात. व्हीगन डाएटमध्ये दुधाऐवजी सोया मिल्कचे सेवन केले जाते. या डाएटमध्ये केवळ वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश केला जातो.
थोडक्यात प्राण्यांचे मांस, दूध आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ व्हीगन डाएटमध्ये टाळले जातात. व्हीगन डाएटमुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.
व्हीगन डाएटमध्ये समाविष्ट असलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. व्हीगन डाएटमधील खाद्यपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे, आपल्या शरीरातील पेशींना तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. यामुळे, प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ही लक्षणीयरीत्या कमी होतो.
व्हीगन डाएट हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील हा डाएट अत्यंत उपयुक्त आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी व्हीगन डाएट जरूर फॉलो करावे. कारण, व्हीगन डाएटमध्ये समाविष्ट असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे, वजन कमी करण्यास मदत होते.
काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हीगन डाएटचे पालन केल्याने किंवा हा डाएट फॉलो केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे, रक्तदाबाचा धोका हा लक्षणीयरित्या कमी होतो. मधुमेह आणि किडनीच्या आजारांमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना देखील व्हीगन डाएटचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.