पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या रोगाची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. यादरम्यान सर्दी, खोकला, घसादुखी आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान त्रास जाणवू लागतो. सोबतच इंफेक्शनमुळे तापही येण्याची समस्या निर्माण होते. इंफेक्शनमुळे तीव्र स्वरुपात शरीर दुखणे आणि तापही येऊ शकतो. पावसाळा ऋतुमध्ये पसरणाऱ्या साथीच्या रोगाचे प्रकार अनेक असतात.
यापैकी एकच आजार म्हणजे यलो फीवर. विशिष्ट प्रकारचे डास चावल्याने या तापाची लागण होते. एडिस आणि हेमागोगस नावाचे डास चावल्याने या हा व्हायरसची लागण होते. डास चावल्यानंतर तीन ते सहा दिवसांच्या आत या तापाची लक्षणे रूग्णामध्ये आढळतात. या लेखाच्या माध्यमातून यलो फीवरची लक्षणे व औषधोपचाराची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
यलो फीवरची (How is yellow fever transmitted in Marathi) लागण झाली असल्यास पाठदुखी, स्नायूदुखी आणि तीव्र स्वरुपात डोकेदुखी अशा समस्या होऊ शकतात. एडिस व हमोगोगस नावाचे डास चावल्यास यलो फीवरची लागण होते.
डास चावल्यानंतर यलो फीवरची लक्षणे आठवड्याभरामध्ये रूग्णामध्ये पाहावयास मिळतात. या तापाची लागण झाल्यास रूग्णाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाली नमूद केलेली लक्षणे रूग्णामध्ये आढळून येतात.
स्नायूदुखी आणि पाठदुखी
उलट्यांचा त्रास होणे
थकवा येणे
तीव्र स्वरुपात शारीरिक वेदना होणे
अस्वस्थ वाटणे
त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
तीव्र स्वरुपातील डोकेदुखीचा त्रास होणे
यलो फीवर या आजारावर अद्याप कोणत्याही प्रकारचे औषधोपचार उपलब्ध नाहीत. पण या आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी डॉक्टर रूग्णांना मुबलक प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात.
या तापाची लागण झाल्यास रूग्णाला व्हॅक्सिन (Yellow Fever Vaccine in Marathi) दिले जाऊ शकते.
रूग्णावर उपचार करताना डॉक्टर त्यास नॉन स्टेरॉइडल अँटी- इंफ्लेमेटरी औषधे सुचवतात.
रूग्णांना शक्यतो जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो.
यलो फीवरची लागण झाल्यास काय खबरदारी घ्यावी? (Yellow Fever prevention in Marathi)
ताप आल्यास थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात.
जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. कारण या तापाची लागण झाल्यानंतर शरीरातील पाण्याची मात्रा कमी होण्याची शक्यता असते.
याव्यतिरिक्त रूग्णाला दलिया आणि सहजासहजी पचतील अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.