WHO Investment Round Kicks Off with Global Support for 2025-2028 Strategy esakal
आरोग्य

WHO Update : ४ वर्षांत वाचणार ४ कोटी लोकांचे प्राण, WHOच्या पहिल्या गुंतवणूक फेरीत 'या' देशांचा सहभाग

Global Health Funds : हेल्थ असेंब्लीच्या ७७ व्या अधिवेशनाच्यामध्ये या उपक्रमाला सुरुवात (WHO First Investment Round to sustainably finance)

सकाळ डिजिटल टीम

WHO : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रविवारी एक नवीन आर्थिक सुदृढीकरणाची योजना सुरू केली आहे. याचा उद्देश्य हवामान बदल, मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर, साथीच्या रोगांचा वाढता धोका, वाढती ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि जगातील अशांततेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनेला आर्थिक मदत मिळवणे हा आहे.

हेल्थ असेंब्लीच्या ७७ व्या अधिवेशनाच्यामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत येत्या एक वर्षात सहभागी देशांच्या सहयोगाने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

या कार्यक्रमांमध्ये सदस्य राष्ट्र आणि इतर हेल्थ डोनेशन संघटनेच्या २०२५ ते २०२८ च्या धोरणाकरीता निधी देतील आणि जागतिक आरोग्य संघटनेला मदत करण्याची वचनबद्धता दर्शवतील.

नवीन आर्थिक सुदृढीकरणाची ही योजना नोव्हेंबरमध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी २० शिखरसंमेलनाच्या वेळी मोठ्या निधी उभारणी कार्यक्रमात महत्वाची ठरेल.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक Dr Tedros Adhanom Ghebreyesus यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, "या योजनेचा उद्देश्य जागतिक आरोग्य संघटनेला निधी मिळवून देणे आणि मिळणाऱ्या निधीची गुणवत्ता सुधारणा करणे हा आहे

सध्या आम्हाला मिळणारा निधी अस्थिर, तात्कालिन गरजेनुसार आणि निश्चित उद्देशांसाठीच वापरता येतो. ही योजना असा निधी उभारण्याचा प्रयत्न आहे जो अधिक काळ टिकाऊ असेल."

जागतिक आरोग्य संघटनेच्या या नवीन योजनेचा तिसरा भाग मंगळवारी २८ मे रोजी हेल्थ असेंब्लीमध्ये लाँच केला जाणार आहे. या अंदाजानुसार, जर संघटनेच्या १४ व्या सर्वसाधारण कार्यक्रमासाठी पूर्ण निधी उपलब्ध झाला तर २०२५ ते २०२८ या काळात ४ कोटी लोकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.

या योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे समर्थन मिळत आहे. ब्राझील सरकारने या योजनेला पाठिंबा दर्शवला असून जी २० शिखरसंमेलनाच्या वेळी या योजनेसाठी निधी उभारणीसाठी कार्यक्रम आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याशिवाय कतार, फ्रांस, जर्मनी आणि नॉर्वे या देशांनीही या योजनेसाठी योगदान देण्याची तयारी दर्शविली आहे.

रविवारच्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या ज्युरीच्या सदस्य असलेल्या भारतीय अभिनेता, चित्रपट निर्मात्या आणि सामाजिक कार्यकत्या नंदिता दास यांच्याकडून WHO च्या हेल्थ फॉर ऑल फिल्म फेस्टिव्हलच्या 5 व्या आवृत्तीतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Assembly Election 2024 Result : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवारांना मंत्री करणार; औसेकरांना विश्वास

Jalgaon Assembly Election 2024 Result : ब्रेक के बाद...गुलाबरावांची ‘हॅट्ट्रिक’; ‘जळगाव ग्रामीण’मधून 59 हजारांचे मताधिक्य

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

IPL 2025 Auction Live: मोहम्मद सिराजसाठी बंगळुरूने RTM चा पर्याय नाकारला अन् सिराज गुजरातमध्ये दाखल झाला

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT