World Cancer Day 2023 sakal
आरोग्य

World Cancer Day : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? वाचा धक्कादायक कारणे

जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

World Cancer Day 2023 : आज कर्करोग दिन आहे. जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दुर्धर आजारांपैकी एक असलेल्या कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलावा आणि जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कर्करोग दिन साजरा केला जातो.

जगभरात कर्करोगाचे अनेक प्रकार दिसून आले आहेत पण हल्ली एका प्रकारच्या कर्करोगाने तरुणाईंमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर. तरुण मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका का वाढलाय? त्यामागील कारणे काय आहेत. याविषयी जाणून घेऊया. (why there is an increase of breast cancer in young women read reasons and symptoms)

तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

मागील दहा वर्षांमध्ये तरुण महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढलाय. विशेषत: तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून आलाय. अगदी 20 ते 30 वर्षांच्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसरचे निदान झाल्याचे दिसून आले आहे.

सामान्यत: तरुण वयोगटात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 15 टक्के आहे, तर 40-45 वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे 30 टक्के आहे तर 30 च्या वर स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण हे 16 टक्के आहे. अगदी कमी वयात ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याने ही चिंतेची बाब आहे.

ब्रेस्ट कॅन्सरमागील कारणे

  • बदलती लाईफस्टाईल ही ब्रेस्ट कॅन्सरचं एक कारण असू शकतो.

  • याशिवाय अनुवंशिकतेमुळेही (जेनेटिक्स) ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. आई किंवा वडिलांमध्ये जर कुणाला कॅन्सर असेल तर तिच्या मुलांनाही कॅन्सर होण्याची शक्यता असते.

  • कुटुंब नियोजन, औषधांच्या अतिरेकाने, व्यसानाधिनतेमुळे, लठ्ठपणा असल्याने, अधिक चरबीयुक्त आहाराचे सेवन केल्याने स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

  • स्तनाच्या ठिकाणी गोळा येणे किंवा गाठ येणे.

  • स्तनाच्या ठिकाणी सूज येणे

  • स्तनाच्या ठिकाणी खाज सुटणे.

  • स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल होणे

  • स्तनाग्रातून स्राव वाहणे

  • स्तनामध्ये वेदना होणे.

  • स्तनाची त्वचा ओलसर वाटणे

  • स्तनाच्या ठिकाणी त्वचा लाल होणे

    डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT