Winter Health Tips  esakal
आरोग्य

Winter Health Tips : हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनची भीती वाटते? खा फक्त ही एक गोष्ट

बदलत्या हवामानामुळे अनेक आजार

सकाळ डिजिटल टीम

Winter Health Tips : आपली आजी म्हणायची की, थंडी कधी एकटी येत नाही सोबत खूप सारे आजार घेऊन येत, तुम्हाला आठवतंय का? बरं जरी नसेल तरी याची प्रचिती तर आलीच असेल की थंडी आली की आजारही येतात; मग स्किन प्रॉब्लेम असो किंवा ताप सर्दी खोकला.

बदलत्या हवामानामुळे अनेक आजारही होतात. यासोबतच या दिवसात बॅक्टेरिया आणि विषाणूही मोठ्या प्रमाणात पसरतात, जे विविध आजारांचे कारण बनतात. आपले फॅमिली डॉक्टर आपल्याला म्हटल्याचं आठवत असेल की, पोटातून औषध गेलं की लगेच फरक पडतो; मुळात पोटात काहीतरी आयुर्वेदिक गुण असणारी गोष्ट जाणं महत्वाचं असतं.

पण उगाच गोळ्या का घेयच्या, त्यापेक्षा आधीच काळजी घेत आजाराला दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्हाला आहारात भरपूर पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उपाय करून पाहण्याची गरज भासणार नाही.

या दिवसात आजारांपासून दूर राहायचे असेल तर प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून आपण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो आणि शरीराला आजारांपासून वाचवू शकतो.

पण सतराशे साठ उपाय करण्यापेक्षा फक्त एक फळ खाऊन तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात आणि इतर आजरांपासून दूर राहू शकतात. ते फळ म्हणजे अंजीर. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर अंजीर खाणे खूप फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. त्यामुळे या दिवसात अंजीर खाणे खूप चांगले असते.

मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी खनिजे अंजीरमध्ये असतात. अंजीरामध्ये फायबर, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन (ए आणि बी कॉम्प्लेक्स) भरपूर असतात. हे सर्दी आणि तपासोबत अनेक आजार दूर ठेवण्याचे काम करते.

तापाची काळजी नको

अंजीर हे उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अंजीर खाल्ल्याने सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन होत नाही.

खोकला आणि कफ होत नाही

अंजीरामध्ये असलेले पोषक तत्व श्वसनसंस्थेसाठी फायदेशीर असतात. अंजीरमध्ये व्हिटॅमिन, प्रथिने, फायबर आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने कफ आणि घशाची खवखव दूर होते. त्यामुळे खोकलाही होत नाही.

त्वचेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात त्वचेची चमकही निघून जाते. या दिवसात त्वचा कोरडी होते. अंजीरामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात, जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीर खायला सुरुवात करा.

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT