'आई' हा शब्द ऐकायला जितका सुंदर वाटतो तितकाच त्याचा प्रवास हा कोणत्याही स्त्री साठी कठीणच असतो. परंतु हा प्रेग्नन्सीचा काळ अधिक सुखकर आणि वेदनाविरहित व आनंदित करण्यासाठी त्या स्त्रीला आरामासोबतच व्यायामाची देखील तितकीच गरज असते.
लोक सहसा विचारतात की गर्भधारणेदरम्यान वजन उचलणे सुरक्षित आहे का? अलीकडेच टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी हेवी डंबेल उचलताना दिसली आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
हा विषय नेहमीच चर्चेचा ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही लोक ते सुरक्षित मानतात तर काही लोक ते हानिकारक मानतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गर्भधारणेदरम्यान वजन उचलणे सुरक्षित आणि फायदेशीर असू शकते जेव्हा काळजी घेऊन आणि मार्गदर्शनाखाली केले जाते.
वजन योग्यरित्या उचलल्याने बाळाला इजा न होता आईचे आरोग्य सुधारू शकते. हे स्नायूंना बळकट करते, प्रसूतीसाठी शरीर तयार करते आणि गर्भधारणेनंतर रिकव्हरी करण्यास मदत करते. वजन उचलण्यासह मध्यम-तीव्रतेचा व्यायाम सहसा सुरक्षित असतो.
वेट लिफ्टिंगमुळे स्नायूंची ताकद सुधारते.
कोर आणि पेल्विक स्नायू मजबूत होतात ज्यामुळे प्रसूती सुलभ होते.
वेट लिफ्टिंग एंडोर्फिन सोडते जे तणाव कमी करते आणि मूड सुधारते.
तुम्हाला चक्कर येत असेल आणि अशक्त वाटत असेल तर वजन उचलू नका.
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल वजन उचलू नका.
ओटीपोटात दुखत असेल तर वजन उचलू नका.