आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला तसेच तरूणींमध्ये PCOD आणि PCOS चं प्रमाण वाढत चाललं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) असेही म्हणतात. हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. योगाच्या माध्यामातून पीसीओडीची समस्या कमी करता येऊ शकते. कारण योगा केल्याने शरीरातील मानसिक,शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असतो.
हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक आहे. नियमित सरावाने पोटाची अतिरिक्त चरबी कमी करता येते. याशिवाय चक्रासन कंबर आणि बाजूची चरबी कमी करण्यास मदत करते. चक्रासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी इतके शक्तिशाली आहे की तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल.
भुजंगासनास कोब्रा पोझ म्हणून ओळखले जाते. या आसनाच्या मदतीने मणक्याला बळकटी मिळते. त्याचबरोबर शरीराची लवचिकता वाढते. तणाव दूर होण्यास मदत होऊन, शरीराला ऊर्जा मिळते.
PCOD मध्ये वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश असावा. हेल्दी फॅटमध्ये तुम्ही ॲवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट्स यासारख्या गोष्टी तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता. हेल्दी फॅट्सचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय प्रमाण वाढते आणि वजन वेगाने कमी होते.