Women Hygiene  esakal
आरोग्य

Women Hygiene : प्लास्टिक पॅडपेक्षा Organic सॅनिटरी पॅड अधिक सुरक्षित, जाणुन घ्या तज्ज्ञांकडून कारण

नियमित पॅडच्या वापरामुळे रोगांचा धोका कमी झाला, तसेच ते वापरणे महिलांसाठी सोयीस्कर ठरले

साक्षी राऊत

Women Hygiene : पूर्वीच्या काळात स्त्रिया मासिक पाळीत कापड वापरत असत. पण काळ जसजसा बदलत गेला तसे लोकही आणि त्यांचे विचारही आधुनिक झाले. कापडाऐवजी पॅडचा वापर होऊ लागला. नियमित पॅडच्या वापरामुळे रोगांचा धोका कमी झाला, तसेच ते वापरणे महिलांसाठी सोयीस्कर ठरले.

पॅड वापरताना ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड अधिक फायदेशीर मानले जातात. याद्वारे प्लास्टिकचा वापरही थांबवता येईल, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते अधिक फायदेशीर मानले जाते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉ. रितू सेठी, ऑरा स्पेशालिटी क्लिनिकच्या संचालक, (गुडगाव) आणि वरिष्ठ सल्लागार यांच्याशी ओनली माय हेल्थने बातचीत केल्यानंतर त्यांनी ऑरगॅनिक पॅड का वापरावे याबाबत सांगितले.

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स जास्त फायदेशीर का आहेत?

हे पॅड्स बनवताना केमिकलचा वापर अजिबात केला जात नाही. ऑरगॅनिक पॅड सामान्यतः ऑरगॅनिक कापूस, बांबू आणि इतर वनस्पती-आधारित फायबरसारख्या नैसर्गिक सामग्रीपासून बनवले जातात. यामध्ये हानिकारक रसायने, प्लास्टिक, सुगंध किंवा सिंथेटिक फायबर यांचा वापर केला जात नाही, ज्यामुळे त्वचेला नुकसान होत नाही. दुसरीकडे, प्लास्टिकच्या पॅडमध्ये अधिक रसायनांचा वापर केला जातो. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

संसर्गाचा धोका कमी होतो

नियमित पॅड घातल्याने बर्‍याच स्त्रियांना खाज सुटणे, जळजळ आणि चिडचिड होते. तर ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे त्वचा रिलॅक्स राहते आणि अॅलर्जी होत नाही.

बराच वेळ कंफर्ट झोन राहतो

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड वापरल्याने वेंटिलेशन व्यवस्थित होते, ज्यामुळे त्वचेला श्वास घेण्यास मदत होते. हे बॅक्टेरियाच्या वाढीची शक्यता देखील कमी करते, जे मासिक पाळीच्या समस्या आणि संक्रमण टाळण्यास मदत करू शकते. (Women)

बायोडिग्रेडेबल आहेत

सेंद्रिय सॅनिटरी पॅड पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असतात, जे पर्यावरणासाठी देखील फायदेशीर असतात. दुसरीकडे, नियमित सॅनिटरी पॅड्सचे जैवविघटन होण्यास बराच वेळ लागू शकतो, जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील हानिकारक आहे. (Menstruation)

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड हे नियमित प्लास्टिक पॅड्सपेक्षा जास्त फायदेशीर मानले जातात. त्यांचा वापर करून रोग पसरण्याचा धोका कमी होतो. तसेच हे पॅड्स जास्त महादेखील नाहीत. एखादे खरेदी केल्यानंतर, आपण ते बऱ्याच काळासाठी वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT