आजकाल प्रत्येकाचं वाढलेलं वजन हा एक गंभीर विषय आहे. बदललेली वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार होत असतात. आजकाल वाढलेलं वजन अस्थमा होण्यासही कारणीभूत ठरत आहे.
दरवर्षी, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी लोकांना अस्थमाबद्दल जागरुकता देण्यासाठी आणि त्याचे उपचार सुधारण्यासाठी जागतिक दमा दिन साजरा केला जातो. यंदा तो ७ मे रोजी साजरा केला जातो.
अस्थमा किंवा दमा हा श्वसनाचा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे, श्वास घेताना शिट्टी सारखा आवाज होणे, अशी लक्षणे दिसतात. आज आपण आपले वाढलेलं वजन कमी केले नाही तर अस्थमाचा आजार बळावू शकतो. कसे ते पाहुयात. (World Asthama Day 2024)
शारीरिक परिणाम
जास्त वजन असलेल्या व्यक्तीच्या छाती आणि पोटावर खूप जास्त दाब पडतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा येतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
असे झाल्यास फुफ्फुसे योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत. फुफ्फुस नीट काम करत नसल्यामुळे व्यायामासारखी शारीरिक कामे करताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
हार्मोनल असंतुलन
लठ्ठपणामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. खरं तर, शरीरातील ऍडिपोज टिश्यू साइटोकिन्स आणि हार्मोन्स सोडतात. ज्याचा आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होतो. आणि यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते. लठ्ठपणामुळे ॲडिपोनेक्टिन आणि लेप्टिन सारख्या संप्रेरकांमध्ये असंतुलनामुळे दम्याची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
इतर आरोग्याच्या समस्या
लठ्ठपणामुळे स्लीप एपनिया, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) सारख्या इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. या वाढलेल्या आजारांमुळे दम्याची पातळी अधिकच वाढू शकते.
लठ्ठ असलेल्यांवर औषधांचा कमी परिणाम
काही संशोधनानुसार, जे लोक लठ्ठ असतात. त्यांवर दम्याच्या औषधांचा फारसा परिणाम दिसून येत नाही. विशेषत: कॉर्टिकोस्टेरॉईड्स सारखे औषध ज्याचा श्वासनलिकेची सूज कमी करण्यासाठी वापर केला जातो, त्यांचा प्रभाव लठ्ठ लोकांवर खूपच कमी असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.